IPL 2026, KKR vs LSG : मुकुल चौधरीचे विजयी चौकार षटकार, स्ट्राईक स्वत:कडे ठेवत लखनौला जिंकवलं

आयपीएल स्पर्धेतील 15व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कोलकात्याने 20 षटकात 4 गडी गमवून 181 धावा केल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना हा सामना लखनौ सुपर जायंट्सने 3 गडी राखून जिंकला.

IPL 2026, KKR vs LSG : मुकुल चौधरीचे विजयी चौकार षटकार, स्ट्राईक स्वत:कडे ठेवत लखनौला जिंकवलं
IPL 2026, KKR vs LSG : मुकुल चौधरीचे विजयी चौकार षटकार, स्ट्राईक स्वत:कडे लखनौला जिंकवलं
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 09, 2026 | 11:34 PM

आयपीएल 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. सामन्यातील निकाल लागताच गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. 15 सामन्यांचा खेळ संपला असून 15व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान ठेवलं. लखनौ सुपर जायंट्सच्या हातून सामना निसटला होता. पण मुकुल चौधरीने सामना खेचून आणला.  त्याने अर्धशतकी खेळीच्या जोरावर हा सामना जिंकवला. एकीकडे धडाधड विकेट पडले असताना त्याने एकहाती हा सामना जिंकवला. शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत या सामन्यात विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे.

लखनौचा डाव

कोलकात्याने विजयासाठी दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना लखनौने आश्वासक सुरूवात केली. मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी 10 च्या धावगतीने धावा केल्या. पण पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एडन मार्करमची विकेट पडली. 22 धावा करून बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्श या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याला 15 धावा करता आल्या. वैभव अरोराने या दोन्ही विकेट काढल्या. ऋषभ पंत 10, आयुष बदोनी 54, निकोलस पूरन 13, अब्दुल समद 2, मोहम्मद शमी 1 धाव करून बाद झाले. त्यामुळे हा सामना केकेआरच्या पारड्यात झुकला होता. समोर आवेश खान होता. त्यामुळे मुकुल चौधरीने त्याला स्ट्राईक दिली नाही. विकेट पडली तर सामना हातातून जाण्याची भीती होती. त्यामुळे त्याने स्ट्राईक जवळ ठेवला आणि शेवटच्या चेंडूवर वगैरे धाव घेतली. मुकुल चौधरीने 27 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकार मारत नाबाद 54 धावा केल्या आणि विजय मिळवून दिला.

16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीची विकेट पडली. त्यामुळे हातात 3 विकेट आणि 24 चेंडूत 54 धावांची गरज होती, तसेच आवेश खान समोर होता. त्यामुळे मुकुल चौधरीने स्ट्राईक स्वत:कडेच ठेवला. 24 पैकी 21 चेंडू एकटा मुकूल चौधरी खेळला आणि 52 धावा केल्या. यात शेवटची धाव अवांतर आली. तर आवेश खानने 3 चेंडूत 1 धाव काढली.

कोलकात्याचा डाव

कोलकाता नाईट रायडर्सकडून अजिंक्य रहाणे आणि फिन एलन जोडी मैदानात उतरली होती. पण संघाच्या 15 धावा असताना फिन एलन 9 धावा करून बाद झाला. प्रिन्स यादवच्या गोलंदाजीवर दिग्वेश राठीने त्याचा सीमेवर झेल पकडला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 52 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली. संघाच्या 99 धावा असताना अजिंक्य रहाणे 41 धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच अंगकृष रघुवंशीची विकेट 45 धावांवर पडली. रिंकु सिंह काही खास करू शकला नाही आणि 4 धावा करू बाद झाला. 4 विकेट पडल्यानंतर कॅमरून ग्रीन आणि रोवमॅन पॉवेल यांनी 40 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली.

Follow Us