AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने केकेआरच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण पहिल्याच षटकात नको ते घडलं.

IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video
IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं VideoImage Credit source: PTI
| Updated on: Apr 09, 2026 | 9:59 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 15व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले. नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गेल्या काही सामन्यात विजयी मार्ग शोधणाऱ्या केकेआर संघाने आक्रमक सुरूवात केली. सलामीला कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिन एलन ही जोडी मैदानात उतरली होती. दुसऱ्या षटकात फिन एलन स्ट्राईकला होता आणि प्रिन्स यादव गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिलाच चेंडू प्रिन्स यादवने वाइड टाकला. त्यानंतर फिन एलनने दोन चौकार मारत लखनौ सुपर जायंट्सवर दबाव वाढवला. तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि चौथ्या चेंडूवर उत्तुंग फटका मारला. हा चेंडू षटकार जाईल असं वाटलं होतं. पण सीमेवर उभ्या असलेल्या दिग्वेश राठीने त्याचा अप्रतिम झेल पकडला. त्यामुळे फिन एलनचा खेळ अवघ्या 8 धावांवर आटोक्यात आला. पण आऊट देताना पंचांकडून मोठी चूक झाली. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला.

नेमकं काय झालं?

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात प्रिन्स यादवच्या गोलंदाजीच्या चौथ्या चेंडूवर फिन एलेनने पुल शॉट मारला. हा चेंडू खूपच वर चढला आणि डीप थर्ड मॅनला असलेल्या दिग्वेश राठीने सीमेजवळ कट टू कट उभं राहून झेल पकडला. हा अप्रतिम झेल म्हणून सुरूवातीला कौतुक झालं. पण जेव्हा रिप्ले पाहिलं गेलं तेव्हा दिग्वेश राठीचा शरीराचा भाग झेल पकडताना सीमारेषेला लागला होता, असं दिसून आलं. इतकंच काय तर बाउंड्री लाईनवर असलेलं कुशनमध्येही हलकी हालचाल दिसली. पण असं असूनही पंचांनी तपासलं नाही आणि एलनला बाद दिलं. त्यामुळे हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे केकेआरचा संघ धावांची लय शोधत असताना अशा पद्धतीने विकेट पडल्याने संताप झाला आहे. जर पंचांनी व्यवस्थितरित्या तपासलं असतं तर फिन एलनची विकेट नाही तर 6 धावा मिळाल्या असत्या.

सोशल मीडियावर जुंपली

आयपीएल स्पर्धेत केकेआरची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने 1 गुण मिळाला. अशा स्थितीत पहिल्या विजयसाठी आणखी वाट पाहावी लागणार अशी स्थिती आहे. त्यामुळे ही विकेट पडल्यानंतर सोशल मीडियावर #FinnAllenNotOut आणि #BadUmpiring हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यात अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 52 चेंडूत 84 धावा केल्या. 10.2 षटकात 99 धावा असताना अजिंक्य रहाणे बाद झाला. त्यानंतर केकेआरची धावगती संथ झाली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...