AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?

IPL 2026, RR vs RCB Head to Head: आयपीएल 2026 स्पर्धेतील 16व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात हेड टू हेड आकडेवारी..

IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?
IPL 2026, RR vs KKR: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 09, 2026 | 8:35 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 16वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. राजस्थान रॉयल्सने तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यात विजय झाला आहे. त्यामुळे या दोन्ही संघात तूल्यबळ लढाई पाहायला मिळणार आहे. आता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे. विजेत्या संघाला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे ही लढाई चुरशीची असणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्सचं होमग्राउंड असलेल्या गुवाहाटीच्या बारसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. मागच्या सामन्यात राजस्थानने याच मैदानावर मुंबई इंडियन्सला 27 धावांनी पराभूत केलं होतं. आता समोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान असणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी हेड टू हेड

आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 34 सामने झाले आहेत. यात आरसीबीचा वजन अधिक असल्याचं दिसून आलं आहे. आरसीबीने 34 पैकी 17 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थान रॉयल्सने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामने निकालाविना सुटले आहेत. आरसीबीची राजस्थानविरुद्ध सर्वाधिक स्कोअर हा 205 आणि किमान स्कोअर हा 70 आहे. राजस्थान रॉयल्सचा आरसीबीविरुद्ध सर्वाधिक स्कोअर हा 217 आणि किमान स्कोअर हा 58 आहे. मागच्या पर्वात या दोन्ही संघात दोन सामने झाले होते. दोन्ही सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले होते. आयपीएल 2024 मध्ये या उलट स्थिती होती. दोन्ही सामने राजस्थान रॉयल्सने जिंकले होते.

नाणेफेकीचा कौल आणि निकाल

नाणेफेकीच्या कौल जिंकण्यात राजस्थान रॉयल्स संघ पुढे आहे. 34 पैकी 18 सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला आहे. तर 15 सामन्यात नाणेफेक आरसीबीने जिंकली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. यात 2 वेळा प्रथम फलंदाजी आणि 8 प्रथम गोलंदाजी घेऊन सामना जिंकला आहे. आरसीबीने 15 नाणेफेकीचे कौल जिंकले, त्यापैकी 11 सामने जिंकले आहेत. यात प्रथम फलंदाजी घेत 3 आणि गोलंदाजी घेत 8 सामने जिंकले आहेत.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....