PBSK vs MI : मुंबईकडे हिशोब करण्याची संधी, पंजाबचा गेम करणार का?
PBSK vs MI : मुंबईकडे हिशोब करण्याची संधी, पंजाबचा गेम करणार का?

गुरुवारी 14 मे रोजी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोासमातील 58 व्या सामन्यात (IPL 2026) पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 12 वा सामना असणार आहे. पंजाबने पहिल्या 7 पैकी 6 सामने जिंकून प्लेऑफचा दावा मजबूत केला होता. तसेच पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी होती. मात्र त्यानंतर पंजाबचे दिवस फिरले. पंजाबला सलग 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर उर्वरित 3 पैकी 2 सामने कोणत्याही स्थितीत जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे पंजाबचा चांगला कस लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे मुंबईला पराभव झाला तरी तसा काही फरक पडणार नाही. मात्र पंजाबचा पराभव झाल्यास त्यांच्याच अडचणीत वाढ होईल. त्यामुळे पंजाबसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे पंजाब मुंबई इंडियन्स विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.