AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI Live Streaming : पंजाब विरूद्धच्या सामन्याच्या वेळत बदल? किती वाजता सुरुवात होणार?

Punjab Kings vs Mumbai Indians IPL 2026 Live Scorecard : पंजाब किंग्सला गेल्या सलग 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे पंजाबसमोब सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे.

PBKS vs MI Live Streaming : पंजाब विरूद्धच्या सामन्याच्या वेळत बदल? किती वाजता सुरुवात होणार?
Punjab Kings vs Mumbai IndiansImage Credit source: Bcci
| Updated on: May 14, 2026 | 12:51 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 58 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण 12 वा सामना असणार आहे. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार याजव याच्याकडे पलटणच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. पंजाबला हा सामना जिंकून प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे मुंबई सामना जिंकून पंजाबच्या अडचणी वाढवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना गुरुवारी 14 मे रोजी होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स लाईव्ह सामना जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर पाहायला मिळेल. तसेच मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यातील प्रत्येक अपेडट https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकवरील लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेता येईल.

2 गुणांसाठी कडवी झुंज, कोण मारणार मैदान?

पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यर सातत्याने खोऱ्याने धावा करतो. तसेच प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या आणि सूर्यांश शेडगे हे अनकॅप्ड फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करतायत. त्यामुळे पंजाब अपवाद वगळता प्रत्येक सामन्यात सहज 200 धावा करतायत. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर विस्फोटक बॅटिंग करणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांना स्वस्तात गुंडाळण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे पंजाब मैदान मारणार की मुंबई 2 गुणांची कमाई करणार? क्रिकेट चाहत्यांना या उत्तरासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा