AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: क्वॉलिफायर 1 मध्ये आरसीबी आणि गुजरात भिडणार, हैदराबादचा सामना कोणाशी?

आयपीएल 2026 स्पर्धेच्या टॉप 2मधील संघ आरसीबी विरुद्ध हैदराबाद सामन्यानंतर स्पष्ट झाला आहे. क्वॉलिफायर 1 मध्ये बंगळुरूची लढत गुजरातशी होणार आहे. तर एलिमिनेटर फेरीत हैदराबादचा प्रतिस्पर्धी कोण? गणित जर तरमध्ये अडकलं.

IPL 2026: क्वॉलिफायर 1 मध्ये आरसीबी आणि गुजरात भिडणार, हैदराबादचा सामना कोणाशी?
IPL 2026: क्वॉलिफायर 1 मध्ये आरसीबी आणि गुजरात भिडणार, हैदराबादचा सामना कोणाशी?Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 22, 2026 | 11:31 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 67वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. हा सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला. पण टॉप 2 गणित काही सोडवता आलं नाही. सनरायझर्स हैदराबादने टॉप 2 गणित सोडवण्यासाठी प्रथम फलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 4 गडी गमवून 255 धावा केल्या. तसेच विजयासाठी 256 धावा दिल्या. खरं तर हा सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला पण टॉप 2 चं गणित काही सोडवता आलं नाही. खरं तर आरसीबीला 165 धावांवर रोखणं गरजेचं होतं. पण तसं करण्यात सनरायझर्स हैदराबादला अपयश आलं. आरसीबीने 4 गडी गमवून 200 धावा केल्या आणि हैदराबादने 55 धावांनी हा सामना जिंकला. त्यामुळे नेट रनरेटचं गणित चुकलं. सनरायझर्स हैदराबादचे 18 गुण झाले आणि नेट रनरेट हा +0.524 आहे. पण गुजरात टायटन्सच्या +0.695 नेट रनरेटच्या पुढे काही जाऊ शकला नाही. त्यामुळे हैदराबादला एलिमिनेटर सामन्यात खेळावं लागणार आहे. तर क्वॉलिफायर 1 मध्ये आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना 26 मे रोजी होणार आहे. तर एलिमिनेटर सामना 27 मे रोजी होईल.

सनरायझर्स हैदराबादचा सामना कोणाशी?

सनरायझर्स हैदराबादचे 18 गुण असले तर नेट रनरेटच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे एलिमिनेटर फेरीत खेळावं लागणार आहे. एलिमिनेटर फेरीतील चौथा संघ अजून काही ठरलेला नाही. या शर्यतीत राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आहे. त्यामुळे चार संघांपैकी जो संघ गुण आणि नेट रनरेटचं गणित सोडवेल त्याला एलिमिनेटर फेरीत खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे तारेवरची करसत असणार आहे. सर्व गणित एकमेकांच्या जय पराजयावर अवलंबून आहे.

राजस्थान रॉयल्सला एलिमिनेटर खेळण्याची सोपी संधी आहे. शेवटचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना जिंकला तर चौथ्या स्थानी विराजमान होतील. पण हा सामना गमावला तर पत्ता कट होऊ शकतो. पंजाब किंग्स आणि केकेआरला तशीच संधी आहे. या दोन्ही शेवटचा सामना जिंकला तर 15 गुण होतील. पण या दोन्ही संघांना राजस्थान रॉयल्सच्या पराभवाची वाट पाहावी लागेल. दुसरीकडे, या राजस्थान रॉयल्स, केकेआर आणि पंजाब किंग्सचा शेवटच्या सामन्यात पराभव झाला, तर दिल्ली कॅपिटल्सला नेट रनरेटच्या आधारावर प्लेऑफचं चौथं स्थान गाठता येऊ शकतं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...