IPL 2026, RCB vs GT: सामना सुरू असताना वैभव सूर्यवंशीला ऑरेंज मिळाली, कारण की..

आयपीएल 2026 स्पर्धेचा ऑरेंज कॅपचा मानकरी सामना सुरू असताना निश्चित झाला आहे. ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशीला मिळणार हे कन्फर्म झालं आहे. गुजरात टायटन्सच्या दोन विकेट पडल्या आणि त्याचं नाव निश्चित झालं.

IPL 2026, RCB vs GT: सामना सुरू असताना वैभव सूर्यवंशीला ऑरेंज मिळाली, कारण की..
IPL 2026, RCB vs GT: सामना सुरू असताना वैभव सूर्यवंशीला ऑरेंज मिळणार झालं कन्फर्म, कारण की..
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 31, 2026 | 8:23 PM

आयपीएल 2026 स्पर्धचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला आणि गुजरात टायटन्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर हा निर्णय शुबमन गिलच्या मनासारखा झाला होता. पण संघाची सुरूवात मात्र निराशाजनक झाली. अवघ्या 26 धावांवर गुजरात टायटन्सच्या 2 विकेट पडल्या. पण यानंतर वैभव सूर्यवंशीचा ऑरेंज कॅपचा मार्ग मोकळा झाला. कारण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शुबमन गिल आणि साई सुदर्शन हे दोघं होते. या दोघांच्या कामगिरीवर वैभव सूर्यवंशीला ऑरेंज कॅप मिळणार की नाही हे स्पष्ट होणार होतं. हे दोघंही स्वस्तात बाद झाले. साई सुदर्शन 12 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. तर शुबमन गिलची खेळी 8 चेंडूत 10 धावा करून संपुष्टात आली. आता वैभव सूर्यवंशीच्या आसपास कोणीच नाही. त्यामुळे ऑरेंज कॅपचा मानकरी वैभव सूर्यवंशीच असणार हे निश्चित झालं आहे.

वैभव सूर्यवंशीने 16 सामन्यातील 16 डावात 776 धावा केल्या आहेत. या धावा त्याने 48.50 च्या सरासरीने आणि 237.30 च्या स्ट्राईक रेटने केल्या. यात पाच अर्धशतकं आणि एक शतकाचा समावेश आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 72 षटकार मारले, तर 63 चौकारही त्याच्या नावावर आहेत. या स्पर्धेतील त्याची 103 ही सर्वोत्तम खेळी ठरली. शुबमन गिल या स्पर्धेत फक्त 10 धावा करून शकल्याने त्याची मजल 16 सामन्यानंतर 732 धावांपर्यंत राहिली. तर साई सुदर्शन 722 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर कायम राहणार आहे. त्याच्याशिवाय आता या शर्यतीत कोणीच नाही.

आरसीबीकडून विराट कोहलीने 600 धावा केल्या आहेत. पण वैभव सूर्यवंशीच्या पुढे जाण्यासाठी 177 धावा कराव्या लागतील. ते काही शक्य नाही. सनरायझर्स हैदराबादचे हेनरिक क्लासेन आणि इशान किशन टॉप 5 मध्ये आहेत. पण त्यांची संधी एलिमिनेटर फेरीतच संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैभव यंदाच्या पर्वातील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला हे सामना सुरू असताना कन्फर्म झालं. अवघ्या 15व्या वर्षी ऑरेंज कॅप मिळवणारा वैभव सूर्यवंशी हा अंडर एज आणि अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.

Follow Us