AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Final, RCB vs GT: नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने, वाटेला प्रथम फलंदाजी आल्याने गिल म्हणाला की…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाणेफेकीचा कौल हा आरसीबीच्या बाजूने लागला. त्यामुळे गुजरात टायटन्सला मनासारखा घेता आला नाही, असं क्रीडाप्रेमींना वाटलं. पण शुबमन गिलने आपला निर्णय सांगताच अनेकांचा जीव भांड्यात पडला.

IPL Final, RCB vs GT: नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने, वाटेला प्रथम फलंदाजी आल्याने गिल म्हणाला की...
IPL Final, RCB vs GT: नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने, वाटेला प्रथम फलंदाजी आल्याने गिल म्हणाला की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 31, 2026 | 7:52 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने लागला. कर्णधार रजत पाटीदारने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली. धावांचा पाठलाग करण सोपं जाईल असं त्याचं म्हणणं होतं. रजत पाटीदार म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी बरीच चांगली आहे. मला नाही वाटत की त्यात फारसा बदल होईल. गेल्या वर्षीच्या खूप आठवणी आहेत. हा सामना जिंकण्यासाठी आम्हाला आमचा सर्वोत्तम प्रयत्न करावा लागेल. वर्तमानात राहणे महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, त्यावरच लक्ष केंद्रित करूया. या स्टेडियमवर खेळायला नेहमीच आवडते. त्याच संघासह खेळणार आहोत.’ त्यामुळे शुबमन गिलच्या मनाविरुद्ध निर्णय गेला असं वाटलं. पण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीच घेणार होतो असं त्याने सांगितलं.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी केली असती. ही एक सामान्य खेळपट्टी आहे, इथे आमचा हा तिसरा सामना आहे. पहिल्या तीन षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी हालचाल मिळू शकते. हे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे. आमच्या संघात एक बदल आहे. साई किशोरच्या जागी अर्शद खान संघात आला आहे.’ आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या 18 सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने 10 वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर 8 संघांनी नाणेफेक गमवूनही जेतेपद मिळवलं आहे. नाणेफेक गमवून 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स, 212 मध्ये केकेआर, 2015 मध्ये मुंबई इंडियन्स. 2020 मध्ये मुंबई इंडियन्स, 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्स, 2022 मध्ये गुजरात टायटन्स, 2024 मध्ये केकेआर, 2025 मध्ये आरसीबीने जेतेपद मिळवलं आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात प्रथम गोलंदाजी करताना 18 पर्वात फक्त 8 संघ विजयी होऊ शकले आहे. मागच्या पर्वातही आरसीबीच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य गाठताना 20 षटकात पंजाब किंग्स 7 गडी गमवून 184 धावा करू शकला. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण गोलंदाजी निवडणाऱ्या पंजाब किंग्सला काही लक्ष्य गाठता आलं नव्हतं आणि 6 धावांनी पराभव झाला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...