AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि…! आयपीएल ट्रॉफीवर लिहिलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहिती आहे का?

IPL Trophy History: आयपीएल स्पर्धेच्या 19व्या पर्वात जेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. असं असताना आयपीएल ट्रॉफीवर कोरलेल्या संस्कृत श्लोकाबाबत माहिती आहे का?

यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि…! आयपीएल ट्रॉफीवर लिहिलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहिती आहे का?
यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि…! आयपीएल ट्रॉफीवर लिहिलेल्या या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहिती आहे का?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 31, 2026 | 6:30 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेचा विजेता अवघ्या काही तासात समोर येणार आहे. जेतेपदाच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. विजेत्याला आयपीएलची चमचमणारी ट्रॉफी उंचवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही ट्रॉफी कोण उंचावणार याची उत्सुकता आहे. आतापर्यंत आयपीएलच्या 18 पर्वात 8 संघांनी ट्रॉफी हाती घेतली आहे. यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर केकेआरने तीन वेळा जेतेपद मिळवलं आहे. तसेच राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स आणि आरसीबीने प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जेतेपदाच्या चमचमत्या ट्रॉफीवर एक संस्कृत श्लोक लिहिला आहे. त्या संस्कृत श्लोकातून एक संदेश दिला गेला आहे. त्याचा अर्थ काय ते जाणून घेऊयात..

काय लिहिलं आहे ट्रॉफीवर?

आयपीएल ट्रॉफीवर सुवर्ण अक्षरात एक संस्कृत श्लोक लिहिला आहे. संस्कृत ही भारताती प्राचीन भाषांपैकी एक आहे. संस्कृतमध्ये ‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि.’ असं लिहिलं आहे. “जिथे प्रतिभा आणि संधी एकत्र येतात.” असा संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे. ही फक्त ट्रॉफीवरील एक ओळ नाही, तर इंडियन प्रीमियर लीगची अधिकृत टॅगलाइन आणि बोधवाक्य देखील आहे. आयपीएल स्पर्धेला 2008 मध्ये सुरूवात झाली. तेव्हापासून जगभरातील दिग्गज आणि नवोदित खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेमागचा हाच हेतू होता.

आयपीएल स्पर्धेत 2008 ते 2010 या तीन वर्षात ट्रॉफी आजपेक्षा वेगळी होती. भारताच्या नकाशा असलेली ट्रॉफी होती. त्यानंतर बीसीसीआयने या ट्रॉफीचं रुप बदललं. लीगला जागतिक प्रसिद्धी आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी ट्रॉफीला एका सुंदर चषकाचा आकार दिला गेला. 2011 पासून आजतागायत हीच ट्रॉफी वापरली जाते. सोन्याचा मुलामा असलेली ट्रॉफी असून त्याच्या तळाशी दरवर्षी नव्या विजेत्याचं नाव कोरलं जातं. आयपीएलची मूळ ट्रॉफी हा फिरता चषक असतो. विजेत्या संघाला त्याची हुबेहूब प्रतिकृती दिली जाते आणि मूळ ट्रॉफी बीसीसीआय कार्यालयात सुरक्षित ठेवली जाते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...