AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSG सारखं RCB ही सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालणार? चॅम्पियन्स लीगनंतर आता आयपीएलकडे नजरा

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत जेतेपद कोण मिळवणार याबाबत उत्सुकता आहे. पण आरसीबीच्या जेतेपदाचा एक योग जुळून आला आहे. याचं थेट नातं चॅम्पियन लीग स्पर्धेशी जोडलं जात आहे.

PSG सारखं RCB ही सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालणार? चॅम्पियन्स लीगनंतर आता आयपीएलकडे नजरा
PSG सारखं RCB ही सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालणार? चॅम्पियन्स लीगनंतर आता आयपीएलकडे नजराImage Credit source: Getty/PTI
| Updated on: May 31, 2026 | 5:26 PM
Share

PSG Win UEFA Champions League 2026: क्रीडाजगतात जेतेपदाचा मान पहिल्यांदा मिळवल्यानंतर दुसऱ्यांदा ही कामगिरी पुन्हा करणं कठीण असतं. त्यामुळे सलग जेतेपद मिळवणाऱ्या संघाकडे चॅम्पियन म्हणून पाहिलं जातं. इतकंच काय तर गजविजेत्या संघाने पुन्हा जेतेपदाला गवसणी घातली तर आनंद द्विगुणित होतो. असंच काहीसं फुटबॉल लीग स्पर्धेत पाहायला मिळालं. पॅरिस सेंट जर्मनने (पीएसजी) हा कारनामा केला आहे. बुडापेस्टच्या पुस्तकास एरेना येथे अंतिम फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात पीएसजी आणि आर्सेनल हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पीएसजीने पेनल्टी शूटआऊटमध्ये आर्सेनलला 4-3 ने पराभूत केलं. यासह सलग दुसऱ्यांदा युईएफए चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. पीएसजी इतिहासही आरसीबीसारखाच होता. गेल्या अनेक वर्षांपासून जेतेपदापासून दूर होते . मात्र मागच्या पर्वात जेतेपदाला गवसणी घातली होती. तसेच यंदाही जेतेपद मिळवलं आहे.

पॅरिस सेंट-जर्मेन हा युरोपमधील सर्वात बलाढ्य फुटबॉल संघांपैकी एक असूनही त्यांना त्यांची पहिली चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकण्यासाठी 55 वर्षे लागली. पीएसजीने सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवल्यानंतर तशाच कामगिरीची अपेक्षा आता आरसीबीकडून आहे. मागच्या पर्वात आरसीबीने आयपीएलचं जेतेपद पहिल्यांदा मिळवलं होतं. तसेच दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आरसीबीचा अंतिम फेरीचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. आता रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबी संघ जेतेपदाला गवसणी घालणार का? हा प्रश्न आहे. आरसीबीला सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. यंदाच्या पर्वात गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं होतं. तसेच क्वॉलिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सला पराभूत केलं होतं. त्यामुळे विजयाची अपे७ा अधिक आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चॅम्पियन बनण्यासाठी 18 वर्षे लागली. त्यांनी आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सलग दोन वेळा जेतेपद मिळवण्याची संधी आहे. यापूर्वी ही किमया चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघाने केली आहे. आता आरसीबीकडे हा कित्ता गिरवण्याची संधी चालून आली आहे. आरसीबीने हा किताब जिंकला तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससोबत सलग दोन वेळा जेतेपद मिळवणाऱ्या संघांच्या पंगतीत बसेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...