AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs CSK : सीएसकेचे 20 ओव्हरआधीच पॅकअप, राजस्थान विरुद्ध पहिल्याच सामन्यात 127 धावा, कोण जिंकणार?

RR vs CSK IPL 2026 : राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या 19 व्या मोसमात विजयी सुरुवात करायची असेल तर 6.40 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत. सीएसकेने राजस्थानसमोर 128 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

RR vs CSK : सीएसकेचे 20 ओव्हरआधीच पॅकअप, राजस्थान विरुद्ध पहिल्याच सामन्यात 127 धावा, कोण जिंकणार?
Ravindra Jadeja and Jamie OvertonImage Credit source: IPL X Account
| Updated on: Mar 30, 2026 | 10:09 PM
Share

चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या 19 व्या मोसमातील आपल्या पहिल्याच आणि स्पर्धेतील एकूण तिसऱ्या सामन्यात ढेर झाली आहे. सीएसकेला राजस्थान विरुद्ध पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. राजस्थानच्या गोलंदाजांसमोर सीएसकेच्या फक्त तिघांनाचा दुहेरी आकडा गाठता आला. त्यातही जेमी ओव्हरटन या एकट्या फलंदाजाने 20 पार मजल मारली. त्यामुळे सीएसकेला राजस्थानसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. राजस्थानने सीएसकेला 2 बॉलआधी ऑलआऊट केलं. जेमी ओव्हरटन याच्या खेळीच्या जोरावर सीएसकेला 19.4 ओव्हरमध्ये 127 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे आता राजस्थानचे फलंदाज घरच्या मैदानात 128 धावांचं आव्हान किती षटकांत पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या गोलंदाजांसमोर अपवाद वगळता टॉप, मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी गुडघे टेकले. सीएसकेच्या फक्त तिघांनाही दुहेरी आकडा गाठता आला. तर इतर 8 फलंदाजांनी निराशा केली.

राजस्थानचे गोलंदाज वरचढ, चेन्नईची पडझड

आयुष म्हात्रे याला भोपळाही फोडता आला नाही. नूर अहमद याने 1 धाव केली. मॅथ्यू शॉर्ट याने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मॅट हॅन्री याने 5 धावा जोडल्या. ओपनर संजू सॅमसन-ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे या तिघांनी प्रत्येकी 6-6 धावा केल्या. तर अंशुल कंबोज याने नाबाद 7 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे सीएसकेला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही.

सर्फराज खान आणि कार्तिक शर्मा या दोघांनी आश्वासक सुरुवात केली होती. सर्फराज आणि कार्तिक दोघेही मोठी खेळी करतील आणि सीएसकेला सावरतील, असं सीएसके चाहत्यांना वाटत होतं. मात्र दोघांपैकी एकालाही या खेळीला मोठ्या आकड्यात बदलता आलं नाही. रवींद्र जडेजा याने सर्फराजला तर ब्रिजेश शर्मा याने कार्तिक शर्मा याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सर्फराजने 12 चेंडूत 17 धावा केल्या. तर कार्तिकने 15 बॉलमध्ये 18 रन्सचं योगदान दिलं.

जेमी ओव्हरटनने लाज राखली

जेमी ओव्हरटन याने सीएसकेसाठी सर्वाधिक धावांचं योगदान देत यलो आर्मीची लाज राखली. जेमीने 36 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह एकूण आणि सर्वाधिक 43 रन्स केल्या. राजस्थानसाठी तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत चेन्नईचं पॅकअप केलं. जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि रवींद्र जडेजा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा आणि रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय
वालधूनी नदीला महापूर! प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जणारा रस्ता बंद
वालधूनी नदीला महापूर! प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जणारा रस्ता बंद
दोन दिवसांवर पालखी... अन् इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी
दोन दिवसांवर पालखी... अन् इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; चारही पूल पाण्याखाली
मुसळधार पावसात रेल्वे स्थानकावरील पत्रेच उडाले, भयानक दृश्य
मुसळधार पावसात रेल्वे स्थानकावरील पत्रेच उडाले, भयानक दृश्य
मावळमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; पाटण गावात ढिगाऱ्याखाली लोक अडकले
Maval Landslide | मावळमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; पाटण गावात ढिगाऱ्याखाली लोक अडकले, NDRF कडून बचावकार्य सुरू