AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs LSG : लखनौच्या सनसनाटी विजयानंतर संजीव गोयंका यांनी मुकुल चौधरीसोबत भर मैदानात काय केलं? पाहा व्हीडिओ

KKR vs LSG Mukul Choudhary and Sanjeev Goenka : युवा फलंदाज मुकुल चौधरी हा लखनौच्या विजयाचा हिरो ठरला. मुकुलने केकेआर विरुद्ध विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. लखनौच्या विजयानंतर संघमालक संजीव गोयंका यांनी मुकुलसोबत काय केलं? जाणून घ्या.

KKR vs LSG : लखनौच्या सनसनाटी विजयानंतर संजीव गोयंका यांनी मुकुल चौधरीसोबत भर मैदानात काय केलं? पाहा व्हीडिओ
Mukul Choudhary KKR vs LSG IPL 2026Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 10, 2026 | 2:28 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल हा शेवटच्या चेंडूवर लागला आहे. गुरुवारी 8 एप्रिलला गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 1 धावेने विजय मिळवला. त्यानंतर आज 9 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर शेवटच्या चेंडूवर मात करत सामना जिंकला. अनकॅप्ड मुकुल चौधरी हा लखनौच्या विजयाचा हिरो ठरला. लखनौला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 30 तर शेवटच्या बॉलवर 1 रनची गरज होती. तेव्हा मुकुलने आवेश खान याच्या सोबतीने 1 धाव काढत लखनौला विजयी केलं. लखनौचा हा 19 व्या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. लखनौच्या या विजयानंतर संघमालक संजीव गोयंका यांनी स्टेडियममध्ये आनंद साजरा केला. त्यानंतर गोयंकांनी मैदानात येऊन मुकुलचं कौतुक केलं.

संजीव गोयंका प्रत्येक सामन्याला हजेरी लावतात. तसेच सामन्यावर आणि खेळाडूंवर त्यांची बारीक नजर असते. गोयंकांची तशीच नजर ही केकेआर विरुद्ध लखनौ सामन्याच्या निकालाकडे होती. सामना रंगतदार स्थितीत असल्याने कोण जिंकणार याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना होती. अनकॅप्ड मुकुल चौधरी मैदानात असल्याने चाहत्यांना लखनौ जिंकेल अशी काही आशा नव्हती. मात्र मुकुलने सर्वांचा अंदाज खोटा ठरवला आणि लखनौला विजयी केलं. लखनौच्या विजयानंतर गोयंकांनी देवाचे आभार मानले. त्यानंतर गोयंका मैदानात आले. गोयंका मुकुलला भेटले आणि त्याचं अभिनंदन केलं. गोयंकांनी मुकुलच्या चेहऱ्यावर हात फिरवला. गोयंका यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सामन्यात काय झालं?

केकेआरने लखनौसमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं होतं. लखनौने अब्दुल समद याच्या रुपात पाचवी विकेट गमावली. त्यामुळे लखनौची स्थिती 12.5 ओव्हरमध्ये 5 आऊट 104 अशी झाली. लखनौला विजयासाठी 43 चेंडूत 78 धावांची गरज असताना मुकुल मैदानात सातव्या स्थानी उतरला. तिथून मुकलने एकट्याच्या जोरावर सामना फिरवला आणि लखनौला सलग दुसरा सामना जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली.

मुकुलची विजयी खेळी, संजीव गोयंका आंनदी

मुकुलने 27 बॉलमध्ये नॉट आऊट 54 रन्स केल्या. मुकुलने या खेळीत 7 षटकार आणि 2 चौकार खेचले. मुकुलने 200 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. तसेच मुकुल व्यतिरिक्त आयुष बदोनी याने 34 बॉलमध्ये 54 रन्स केल्या. त्या व्यतिरिक्त एडन मार्करम याने 22, मिचेल मार्श 15, निकोलस पूरन 13 आणि कॅप्टन ऋषभ पंत याने 10 धावांचं योगदान दिलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...