
आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादची सुरूवात काही चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड स्वस्तात बाद झाले. तर अवघ्या 29 धावांवर तीन विकेट तंबूत होत्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादवर दबाव वाढला होता. या सामन्यात हेनरिक क्लासेन आणि कर्णधार इशान किशनने डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी 53 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे आरसीबीचं टेन्शन वाढलं होतं. कारण 13 षटकात 126 धावांचा पल्ला गाठला होता. त्यामुळे ही जोडी फुटली नाही तर 250 धावा होतील अशी भीती होती. 14 व्या षटकात ही जोडी फोडण्यात यश मिळालं.
आरसीबीने 14वं षटक रोमारियो शेफर्डच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हेनरिक क्लासेनने षटकाराच्या दिशेने फटका मारला. पण फिल सॉल्ट वाऱ्याच्या वेगाने धावत आणि अप्रतिम झेल पकडला. हा झेल एकदम कट टू कट होता. मैदानावरील हा झेल पकडताना त्याचं शरीर सीमारेषेला लागलं नाही ना हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांनी दोन तीन वेळा पाहिल्यानंतर बाद असल्याचं घोषित केलं. ही विकेट मिळताच धावगतीला ब्रेक लागला.
A STUNNER BY PHIL SALT 🤯 KLAASEN IS GONE – RCB are back. pic.twitter.com/S8mkGvv6JD
— Johns. (@CricCrazyJohns) March 28, 2026
हेनरिक क्लासेन बाद झाल्यानंतर इशान किशनने धावगती वाढवण्यासाठी गियर टाकला. त्यात सलील अरोराच्या विकेट पडली. पण इशानने फटकेबाजी सुरू ठेवली. त्यामुळे आरसीबीला काहीही करून ही विकेट हवी होती. अभिनंदन सिंगच्या गोलंदाजीवर इशान किशनने बरोबर गॅपमध्ये फटका मारला होता. पण येथेही फिल सॉल्ट आडवा आला. त्याने जराही चूक न करता एका हाताने अप्रतिम झेल पकडला. त्यामुळे इशान किशनचा डाव 80 धावांवर आटोपला.
THE SUPERMAN PHIL SALT – ONE OF THE GREATEST CATCH EVER 🥶 pic.twitter.com/okY2e405JH
— Johns. (@CricCrazyJohns) March 28, 2026
सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 201 धावा केल्या आहेत. आरसीबीसमोर विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आरसीबीचं होमग्राउंड आहे. तसेच दुसऱ्या डावात दव फॅक्टर पाहता या धावा फार काही नाहीत. हैदराबादचा संघ या धावा रोखतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.