AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 स्पर्धा विक्रमी रेकॉर्डमुळे चर्चेत राहिली, या पर्वात काय घडलं ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयासह झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. पण या पर्वात बरंच काही घडलं. काय विक्रम नोंदवले गेले ते जाणून घेऊयात...

आयपीएल 2026 स्पर्धा विक्रमी रेकॉर्डमुळे चर्चेत राहिली, या पर्वात काय घडलं ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धा विक्रमी रेकॉर्डमुळे चर्चेत राहिली, या पर्वात काय घडलं ते जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 01, 2026 | 12:29 AM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात झाली होती. या सामन्यात आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. पहिल्याच सामन्यात आरसीबीने 6 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर 74व्या सामन्यात अर्थात अंतिम सामन्यात आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. या सामन्यात आरसीबीने पाच गडी राखून गुजरात टायटन्सला नमवलं आणि जेतेपदाला दुसऱ्यांदा गवसणी घातली. या स्पर्धेत मुंबई आणि चेन्नईनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा संघ ठरला. तर एकापेक्षा जास्त ट्रॉफी जिंकणारा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी मुंबई, चेन्नई आणि केकेआरने अशी कामगिरी केली आहे. गुणतालिकेतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 18 गुण आणि +0.783 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर होता. त्यामुळे एकंदरीत या स्पर्धेत आरसीबीचा दबदबा दिसून आला. असं असताना या पर्वात बरंच काही घडलं आयपीएल स्पर्धेत विक्रमांची रांग लागली होती. चला जाणूनघ घेऊयात कोणकोणते विक्रम रचले गेले ते..

आयपीएल 2026 स्पर्धेत काय घडलं?

आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक धावांचा विक्रम या स्पर्धेत घडला. या पर्वात एकूण 27450 धावा झाल्या. या धावा 31.26 प्रति विकेट या गतीने झाल्या. सर्वाधिक 1426 षटकार आणि 2332 चौकारांची नोंद केली गेली. तसेच एकूण 15 जणांनी शतकी खेळी केली. तर 65 डावात 200हून अधिक धावांची नोंद झाली. तर 200हून अधिक धावा 17 वेळा गाठल्या गेल्या. त्यामुळे हे पर्व सर्वार्थाने चर्चेत राहिलं. 2011 पासून सुरू झालेल्या प्लेऑफ स्वरूपाच्या सुरुवातीपासून क्वालिफायर 1 च्या विजेत्याने 16 पैकी 13 आयपीएल अंतिम सामने जिंकले आहेत, यात मागील नऊ सामन्यांचा समावेश आहे.

आयपीएल स्पर्धेत दोन पर्वात पर्पल कॅप जिंकणारा कागिसो रबाडा हा चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ड्वेन ब्राव्होनो 2103, 2015 मध्ये, भुवनेश्वर कुमारने 2016, 2017 मध्ये, हर्षल पटेलने 2021-2024 मध्ये आणि कागिसो रबाडाने 2020 आणि 2026 मध्ये ही कामगिरी केली आहे.

पाच किंवा त्याहून अधिक जेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूमध्ये आता कृणाल पांड्याचा समावेश झाला आहे. रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूने सहा जेतेपद मिळवले आहेत. तर महेंद्र सिंह धोनी, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने पाचवेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...