Vaibhav Suryavanshi: वैभवचं ‘A’ सेलिब्रेशन… आईशी काय कनेक्शन? अभिमानाने वडिलांची फुलली छाती

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने मैदानावर 'A' सेलीब्रेशन साजरं केलं. त्यानं मैदानावर गोलंदाजांना फोडून काढलं. त्याच्या धमाकेदार खेळीने आयपीएलला चार चांद लावले. पण त्याने ए म्हणून काय दाखवलं, असा अनेकांना प्रश्न पडला. त्याचे उत्तर आता समोर आले आहे.

Vaibhav Suryavanshi: वैभवचं ‘A’ सेलिब्रेशन... आईशी काय कनेक्शन? अभिमानाने वडिलांची फुलली छाती
वैभवचं ‘A’ सेलिब्रेशन... आईशी काय कनेक्शन?
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 20, 2026 | 3:25 PM

Vaibhav Sooryavanshi ‘A’ Celeberation: वैभव सूर्यवंशीने लखनऊ सुपर जायंटसविरोधात 19 मे रोजी अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या 23 चेंडूत त्याने तडाखेबंद खेळी खेळली. अर्धशतक केल्यावर त्याने मैदानावर आनंद साजरा केला. फिक्टी केल्यावर त्याने विंगेकडे पाहत ‘A’ अशी बोटाने खूण केली. त्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडला की हे ‘A’ चा अर्थ तरी काय? अनेकांनी डोके खाजवले. पण त्यांना काही यश आले नाही. पण जेव्हा मुरली कार्तिकने त्याला याविषयीचा प्रश्न केला तेव्हा सुद्धा त्याने स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यामुळे प्रेक्षकांची, चाहत्यांची आणि तमाम देशवासियांची उत्सुकता शिगेला पोहचली. ही 50 धावांची सलामी तो कुणाला अर्पण करू इच्छित होता. त्याला कुणाची आठवण येत होती. त्याचा जवळचा मित्र, मैत्रिण, त्याचा गॉडफादर, त्याचा आवडता खेळाडू सर्वांच्या नावाची उजळणी झाली. पण ‘A’ अक्षराशी त्याची जुळणी होत नव्हती. अखेर त्याचे उत्तर समोर आले.

मुरली कार्तिकलाही नाही सांगितले ‘A’ चे सीक्रेट

वैभव सूर्यवंशीने मैदानावर ‘A’ सेलिब्रेशन केले होते. सामना संपल्यानंतर मुरली कार्तिकने त्याला याविषयी खोदून खोदून विचारले. तेव्हा वैभवने गोल गोल फिरवले. त्याने स्पष्ट उत्तर दिले नाही. वैभवने सांगितले की, त्याचा अर्थ फार साधा आहे, विशेष नाही. वैभवला त्यावेळी याविषयीची माहिती द्यायची नव्हती. मी सहजच ती खूण केल्याचा दावा त्याने केला. मैदानावर मी जे काही केले ते सहज केले असा दावा त्याने कार्तिकशी बोलताना केला. पण त्यावर कुणाचाही विश्वास बसला नाही.

वैभव सूर्यवंशीचे ‘A’ सेलिब्रेशन आणि आईशी कनेक्शन

वैभव सूर्यवंशीने मुरली कार्तिकला माहिती दिली नसली तरी राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापकांना याविषयीची माहिती दिली. राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंडर यांच्याशी बोलताना वैभवने भावनिक बाजू मांडली. वैभवच्या आईचे नाव आरती सूर्यवंशी असे आहे. त्याने 50 धावा केल्यानंतर हा खेळी आईला समर्पित केली. आईशी तो अधिक जुळलेला आहे. त्याला मैदानावर त्याच्या आईची आठवण आली. पण ही गोष्ट त्याला कुणाला सांगायची नव्हती. त्याने त्यामुळेच मुरली कार्तिकला याविषयीची माहिती दिली नसल्याचे सांगितले.

वैभवने लखनऊ सुपर जायंट्सविरोधात जी खेळी खेळली ती पाहून त्याच्या वडिलांना अभिमान वाटला. त्यांची छाती फुलली. त्याचा मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंशीने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर याविषयीची माहिती दिली. वडिलांचे कष्ट आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्यामुळेच वैभव सूर्यवंशी मैदानावर चमकदार कारवाई करत असल्याचे उज्ज्वल सूर्यवंशीने सांगितले.

Follow Us