IPL 2027 Retention : रिटेन्शननंतर गेम फिरला, आता LSG आणि KKR बाकीच्यांचा खेळ बिघडवणार, कुणाकडे किती पैसा बाकी?

ipl 2027 auction purse : आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व संघांचं बजेट समोर आलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडे सर्वाधिक 47.45 कोटी रुपये शिल्लक आहेत, तर गुजरात टायटन्सकडे अवघे 8.75 कोटी रुपये आहेत.

IPL 2027 Retention : रिटेन्शननंतर गेम फिरला, आता LSG आणि KKR बाकीच्यांचा खेळ बिघडवणार, कुणाकडे किती पैसा बाकी?
ipl 2027 auction purse
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 8:01 PM

आयपीएल 2027 च्या लिलावापूर्वी सर्व 10 संघांच्या पर्समध्ये किती रक्कम शिल्लक आहे, याची आकडेवारी समोर आली आहे. खेळाडूंना रिलीज केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती पैसा उरला आहे, यावरून आगामी मिनी ऑक्शनमध्ये कोणता संघ मोठी बोली लावू शकतो, याचा अंदाज येत आहे. या आकडेवारीत लखनौ सुपर जायंट्सने बाजी मारली असून त्यांच्या पर्समध्ये सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सकडे सर्वात कमी बजेट असल्याचं समोर आलं आहे.

 लखनौ सुपर जायंट्सकडे सर्वाधिक रक्कम

रिटेन्शननंतर लखनौ सुपर जायंट्सच्या पर्समध्ये तब्बल 47.45 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे आगामी लिलावात खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी लखनौकडे सर्वाधिक आर्थिक ताकद असणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या खात्यात 41.65 कोटी रुपये आहेत. सनरायझर्स हैदराबादकडे 40.15 कोटी रुपये शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या पर्समध्ये 39.5 कोटी रुपये आहेत.

Loading...

मुंबई, चेन्नई आणि राजस्थानकडे किती पैसे?

पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सकडे 32.6 कोटी रुपये शिल्लक आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या पर्समध्ये 28.05 कोटी रुपये आहेत. राजस्थान रॉयल्सकडे 27.05 कोटी रुपये शिल्लक असून पंजाब किंग्सच्या खात्यात 18.6 कोटी रुपये आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पर्समध्ये 14.15 कोटी रुपये आहेत.

गुजरात टायटन्सकडे सर्वात कमी बजेट

या यादीत गुजरात टायटन्सची स्थिती सर्वात वेगळी आहे. त्यांच्या पर्समध्ये केवळ 8.75 कोटी रुपये शिल्लक आहेत. म्हणजेच लखनौच्या तुलनेत गुजरातकडे तब्बल 38.70 कोटी रुपये कमी आहेत.

एकूणच, आगामी लिलावात लखनौ, कोलकाता आणि हैदराबाद या संघांकडे मोठ्या खेळाडूंना खरेदी करण्याची अधिक संधी असेल. मात्र, केवळ पर्समध्ये जास्त रक्कम असणं पुरेसं नसून संघांना आपल्या गरजेनुसार योग्य खेळाडू निवडावे लागणार आहेत. त्यामुळे आयपीएल 2027 च्या लिलावात कोणता संघ किती मोठी बोली लावतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us