IPL 2027 Auction : 20 वर्षांचं झालं आयपीएल! रिटेन्शननंतर आता लिलाव नेमका कधी आणि कुठे? तारीख आली
IPL Auction 2027 : 10 संघांना आपल्या संघातील खेळाडू कायम ठेवण्याची आणि काही खेळाडूंना रिलीज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागली आहे. आता आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनची तयारी सुरू झालीये,. आता सर्वांचे लक्ष या लिलावाकडे लागले आहे.

आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनची तयारी सुरू झाली असून, 10 संघांना आपल्या संघातील खेळाडू कायम ठेवण्याची आणि काही खेळाडूंना रिलीज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागली आहे. आता सर्वांचे लक्ष गोव्यात होणाऱ्या लिलावाकडे लागले आहे. 16 डिसेंबरला होणाऱ्या या ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूवर मोठी बोली लागणार आणि कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक आहे?
कधी होणार नव्या हंगामाचं ऑक्शन?
काल आयपीएलचं सर्वात मोठं रिटेन्शन पार पडलं. यावेळी सर्व 10 संघानी त्यांची प्रक्रिया पार पडली. यावेळी त्यांनी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता कोणत्या खेळाडूंना किती खेळाडूंची गरज आहे. तसंच त्यांच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या आगामी 20व्या हंगामासाठी मिनी ऑक्शनची तारीख जाहीर केली गेली आहे. त्यानुसार आता आयपीएलचा आगामी हंगामाचा लिलाव हा गोव्यामध्ये 16 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या मिनी ऑक्शनला सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.
दरम्यान, सर्व टीमकडे आता किती पैसे शिल्लक आहेत. याचीही आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये सर्वात टॉपला आहे एलएसजी म्हणजे लखनौचा संघ, या संघाकडे आता सर्वाधिक 47.45 कोटी रुपये तर गुजरात टायटन्सकडे सर्वात कमी 8. 75 कोटी रुपये पैसे बाकी आहेत.
इतर संघाबद्द्ल सांगायचं झाल्यास आता कोलकाता नाइट रायडर्सकडे 41.65 कोटी, सनरायझर्स हैदराबादकडे 40.15 कोटी आणि दिल्ली कॅपिटल्सकडे 39.50 कोटी रुपये आहेत. तसेच मुंबई इंडियन्सच्या खात्यात 32.60 कोटी, चेन्नई सुपर किंग्सकडे 28.05 कोटी आणि राजस्थान रॉयल्सकडे 27.05 कोटी रुपये बाकी आहेत. याशिवाय पंजाब किंग्सकडे 18.60 कोटी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 14.15 कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे.
लखनौच्या खालोखाल केकेआर 41.65 कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबादकडे 40. 15 कोटी आणि दिल्ली कॅपिटल्सकडे 39.50 कोटी रुपये शिल्लक आहेत. आता सर्वात मोठा गेम कोण करणार, कोणाकडे सर्वात बड्या खेळाडूवर बोली लावण्याचे नियोजन आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.