AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल लिलावाआधीच संघबदलाचा खेळ सुरू; हैदराबादची दिल्लीसोबत खेळाडूंची अदलाबदल, कुणाला घेतले?

IPL 2027 Trade News: आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादने वेगवान गोलंदाज टी. नटराजनला संघात परत बोलावले आहे.

आयपीएल लिलावाआधीच संघबदलाचा खेळ सुरू; हैदराबादची दिल्लीसोबत खेळाडूंची अदलाबदल, कुणाला घेतले?
| Updated on: Oct 14, 2026 | 7:49 PM
Share

पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगची तयारी सुरू झाली आहे. लवकरच सर्व संघ त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. तर आता संघामध्ये खेळाडूंची अदलाबदलही सुरू झाली आहे. एकेकाळच्या आयपीएल विजेत्या सनरायझर्स हैदराबादने एक मोठी अदलाबदल केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन प्रमुख फ्रँचायझींमध्ये खेळाडूंची मोठी अदलाबदल झाली आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी आयपीएल २०२७ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या करारानुसार, भारताचा सर्वोत्तम डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन सनरायझर्स हैदराबाद संघात परतला आहे. तर युवा लेग-स्पिनर झीशान अन्सारी आता दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. टी. नटराजन यापूर्वी 2020 ते 2024 या काळात सलग पाच हंगामांसाठी सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. त्यावेळी तिथे त्याने आयपीएलमधील सर्वात प्रभावी भारतीय डावखुरा वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून स्वतःला सिद्ध केले होते.

आयपीएल 2024 हा नटराजनच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी हंगाम ठरला होता. ज्यात त्याने 19 बळी घेतले. तो त्या हंगामात SRH चा सर्वात यशस्वी गोलंदाज होता आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएल 2025 च्या खेळाडूंच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने नटराजनला 10.75 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत विकत घेतले होते. मात्र या करारानुसार, तो आता 5 कोटी रुपयांच्या सुधारित शुल्कावर हैदराबादला परत येईल. नटराजनने ७३ आयपीएल सामन्यांमध्ये ७२ बळी घेतले आहेत. या कालावधीतील त्याची सर्वोत्तम कामगिरी ४/१९ ही होती.

तर दुसरीकडे 26 वर्षीय लेग-स्पिनर झीशान अन्सारी सनरायझर्स हैदराबादकडून 10 सामने खेळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होत आहे. झीशानने आपल्या आयपीएल पदार्पणातच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तीन बळी घेत दमदार कामगिरी केली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 10 आयपीएल सामन्यांमध्ये सहा बळी घेतले आहेत. झीशान सध्याच्या 40 लाख रुपयांच्या शुल्कावर दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होईल आणि संघाच्या फिरकी आक्रमणाला अधिक बळकटी देईल.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप