AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aakash Chopra | ….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण

अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं.

Aakash Chopra | ....म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण
अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं.
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 19, 2021 | 7:05 PM
Share

चेन्नई | “अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबईच्या टीमसोबत राहून बरेच काही शिकू शकतो. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे त्याचे वडिल आहेत. सचिन क्रिकेटचं विद्यापीठ आहे. अर्जुनला आपल्या वडीलांकडून खूप काही शिकता येऊ शकतं. अर्जुन आता सर्वात यशस्वी फ्रँचायजीशी जोडला गेला आहे. मुंबईच्या गोटात अर्जुनला क्रिकेटबाबतीत सर्व छक्के पंजे शिकता येतील. अर्जुनने मुंबईसाठी विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुन फक्त त्याच्या आडनावामुळे इथवर पोहचलेला नाही. तो काही न काही करत असतो. मुंबईला अर्जुन हवा होता, त्यामुळे मुंबई फ्रँचायजीने खरेदी केलं आहे”, असं टीम इंडियाचा माजी खेळाडू राहिलेला आकाश चोप्रा म्हणाला आहे. (ipl auction 2021 team india former player aakash chopra on arjun tendulkar)

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा या लिलावातील आकर्षणाचा मुद्दा ठरला. अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्या 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. दरम्यान यानंतर अर्जुनवर सोशल मीडियावरुन घराणेशाहीच्या मुद्यावरुन जोरदार टीका करण्यात येत आहे.

सारा तेंडुलकरकडून कौतुक

अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) अर्जुनचं कौतुक केलं आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन अर्जुनचं कौतुक केलं आहे. अर्जुनला मुंबई इंडियन्सने ताफ्यात सामावून घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन अर्जुनच्या स्वागताची एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. तीच पोस्ट साराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. सोबत साराने म्हटलं आहे की, ‘ही संधी तुझ्याकडून कोणीच हिरावू शकणार नाही’.

मुंबईने आपल्या गोटात लिलावातून एकूण 7 खेळाडू घेतले. त्यापैकी न्यूझीलंड 2, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 1 आणि भारताचे 3 खेळाडू आहेत. यामध्ये सचिन तेडुंलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. मुंबईने अर्जुनला त्याच्या 20 लाख या बेस प्राईजवर खरेदी केलं.

मुंबईने लिलावातून आपल्या ताफ्यात घेतलेले खेळाडू

अॅडम मिल्न (न्यूझीलंड) 3.20 कोटी रुपये.

न्यूजीलंडचा वेगवान गोलंजदाज अॅडन मिल्न हा 14 व्या मोसमात मुंबईच्या ताफ्यात येणारा पहिला खेळाडू ठरला. मिल्नची बेस प्राइस 50 लाख इतकी होती. पण मुंबईने त्याच्यासाठी 3 कोटी 20 लाख रुपये मोजले.

नॅथन कुल्टर नाइल (ऑस्ट्रेलिया), 5 कोटी रुपये.

पीयूष चावला (भारत), 2.2 कोटी रुपये.

युद्धवीर चरक (भारत), 20 लाख रुपये.

मार्को जॅनसन (दक्षिण आफ्रिका), 20 लाख रुपये.

अर्जुन तेंडुलकर ( भारत), 20 लाख रुपये.

जेमी निशाम (न्यूजीलंड), 50 लाख रुपये.

संबंधित बातम्या :

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, नेटकऱ्यांकडून जोरदार टीका

अर्जुन तेंडुलकरच्या IPL निवडीवर बहीण साराची पहिली प्रतिक्रिया

IPL Mumbai Indians Team 2021 | वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूसह अनेक अनुभवी खेळाडू, पाहा मुंबई इंडियन्सची टीम

(ipl auction 2021 team india former player aakash chopra on arjun tendulkar)

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?