Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, नेटकऱ्यांकडून जोरदार टीका

अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं.

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, नेटकऱ्यांकडून जोरदार टीका
अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं.

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव (IPL Auction 2021) चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमध्ये पार पडला. या लिलावात एकूण 57 खेळाडूंना विविध फ्रँचायजींनी आपल्या ताफ्यात घेतलं. या लिलावात अनेक रेकॉर्ड पाहायला मिळाले. ख्रिस मॉरिस हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. दरम्यान सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा या लिलावातील आकर्षणाचा मुद्दा ठरला. अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्या 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. दरम्यान यानंतर अर्जुनवर सोशल मीडियावरुन घराणेशाहीच्या मुद्यावरुन जोरदार टीका करण्यात येत आहे. (ipl 2021 auction netizens trolled to arjun tendulkar on nepotism)

सोशल मीडियावर याबाबत दोन गट पाहायला मिळत आहेत. एक गट हा अर्जुनचे समर्थन करणारा आहे, तर दुसरा गट त्याला घराणेशाहीवरुन टीका करणारा. मुंबईने अर्जुनला खरेदी करणं म्हणजे घराणेशाहीला खतपाणी घातल्यासारखंच आहे, असं काही नेटीझन्सचं मत आहे. तर “अर्जुनने त्याचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. त्याने विविध वयोगटातील स्पर्धेत उल्लेखीय कामगिरी केली आहे. यामुळे त्याच्यावर टीका करणं अयोग्य आहे”, असंही काही जणांच म्हणणं आहे.

अर्जुनने (Arjun Tendulkar) नुकताच मुंबईच्या सीनियर टीममधून (वरीष्ठ संघाकडून) टी-20 पदार्पण केलं. अर्जुनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. याआधी तो 2018 मध्ये भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा भाग होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळावी, यासाठी अर्जुन प्रयत्न करत राहिला. 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. यापूर्वी तो इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे. दरम्यान, मुंबईच्या संघासाठी डेब्यू करणाऱ्या अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.

प्रणव धनावडेची आठवण

यानिमित्ताने काही नेटकऱ्यांना क्रिकेटपटू प्रणव धनावडेची आठवण झाली आहे. प्रणव धनावडेने काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेत 307 चेंडूत विक्रमी 1 हजार 7 धावा चोपल्या होत्या. प्रणव सर्वसाधारण असल्याने तो इथवर पोहचू शकला नाही. इथे तुमच्या कर्तुत्वाला नाही तर ओळखीला आणि वशेलीबाजीला महत्व आहे, असंही काहींच मत आहे.

मुंबई इंडियन्सकडून स्वागत

मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरचं आपल्या संघात जोरदार स्वागत केलं आहे. एका खास व्हिडीओद्वारे अर्जुनचं स्वागत केलं आहे. अर्जुनच्या रक्तातच क्रिकेट आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सारा तेंडुलकरकडून कौतुक

अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) अर्जुनचं कौतुक केलं आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन अर्जुनचं कौतुक केलं आहे. अर्जुनला मुंबई इंडियन्सने ताफ्यात सामावून घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन अर्जुनच्या स्वागताची एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. तीच पोस्ट साराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. सोबत साराने म्हटलं आहे की, ‘ही संधी तुझ्याकडून कोणीच हिरावू शकणार नाही’.

संबंधित बातम्या :

अर्जुन तेंडुलकरच्या IPL निवडीवर बहीण साराची पहिली प्रतिक्रिया

अर्जुन तेंडुलकरवर 20 लाखांची बोली, कोणत्या संघाकडून खरेदी?

(ipl 2021 auction netizens trolled to arjun tendulkar on nepotism)

Published On - 3:36 pm, Fri, 19 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI