IPL Auction 2021 Highlights | ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

Ipl Auction 2021 Live | आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा खेळाडूंचा लिलाव (Ipl Auction 2021) चेन्नईत पार पडला.

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 21:02 PM, 18 Feb 2021
IPL Auction 2021 Highlights | ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव
आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच्या लिलावाचं चेन्नईत आयोजन करण्यात होतं.

चेन्नई : आयपीएल 2021 चा लिलाव संपला आहे. चेन्नई येथे झालेल्या लिलावात 298 खेळाडूंची बोली लावण्यात आली होती, त्यापैकी 8 फ्रँचायझींनी एकूण 57 खेळाडू खरेदी केले. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने त्याला 16.75 कोटींच्या भारी किंमतीसह खरेदी केले. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जॅमीन्सन हा या मोसमातील दुसरा महागडा खेळाडू ठरला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) त्याला 15 कोटींमध्ये खरेदी केले. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलसाठी आरसीबीने 14 कोटी 25 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.  (ipl 2021 auction live in marathi from chennai MI kkr dc csk rr rcb srh kxip all live updates)

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 18 Feb 2021 21:01 PM (IST)

  एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

  आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव (IPL Auction 2021) संपला आहे. यामध्ये 298 खेळाडूंपैकी एकूण 57 खेळाडूंना विविध संघांनी मोठी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरीस (Chris Morris) हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मॉरीसला RCB ने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. तसेच कृष्णप्पा गौतम हा महागडा अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला) खेळाडू ठरला. गौतमसाठी CSK ने 9 कोटी 25 लाख रुपये मोजले.

  सर्वाधिक खेळाडू कोणी खरेदी केले?

  पंजाबने सर्वाधिक खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. पंजाबने एकूण 9 खेळाडूंना आपल्या गोटात घेतलं. तर SRH ने सर्वात कमी म्हणजेच 3 खेळाडू घेतले. तर RCB, RR, KKR आणि DC ने प्रत्येकी 8 खेळाडू खरेदी केले.

 • 18 Feb 2021 20:44 PM (IST)

  बेस प्राईजमध्ये खेळाडूंना एंट्री

  या लिलावातील अखेरच्या टप्प्यात काही खेळाडूंना त्यांच्या मुळ किंमतीत खरेदी केलं आहे. पवन नेगीला kkr ने 50 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. तर वेंकटेश अय्यरला 20 लाखांमध्ये खरेदी केलं आहे. तसेच आकाश सिंहला RR ने 20 लाख मोजून आपल्याकडे घेतलं आहे.

 • 18 Feb 2021 20:18 PM (IST)

  सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबईच्या ताफ्यात

  माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात सामावून घेतलं आहे.

 • 18 Feb 2021 20:17 PM (IST)

  सचिनचा तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

  सचिनचा तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला  मुंबई इंडियन्सच्या गोटात घेण्यात आलं आहे. अर्जुनला त्याच्या 20 लाखांच्या बेस प्राईज मध्ये समाविष्ट करण्यात आलंं आहे. अर्जुनला कोणता संघ आपल्या ताफ्यात घेणार याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष होतं.

  दरम्यान आता आगामी मोसमात अर्जुन मुंबईच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. अर्जुनने विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये उल्लेखीनय कामगिरी केली आहे.

 • 18 Feb 2021 20:17 PM (IST)

  सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबईच्या ताफ्यात

  माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात सामावून घेतलं आहे.

 • 18 Feb 2021 20:11 PM (IST)

  हनुमा विहारी अनसोल्ड

  टीम इंडियाचा खेळाडू हनुमा विहारी अनसोल्ड ठरला आहे.

 • 18 Feb 2021 20:10 PM (IST)

  बेन कटिंग KKR च्या ताफ्यात

  बेन कटिंगला KKR ने बेस प्राइज 75 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. तर सी हरी निशांतला CSK ने 20 लाख देत गोटात समाविष्ट केलं आहे.

 • 18 Feb 2021 20:04 PM (IST)

  गुरकीरत मान आणि पवन नेगी यांची दुसऱ्यांदा निराशा

  गुरकीरत मान आणि पवन नेगी यांच्या पदरी दुसऱ्यांदा निराशा पडली आहे. या दोघांना दुसऱ्या राऊंडमध्येही खरेदीदार मिळाला नाही.

 • 18 Feb 2021 19:54 PM (IST)

  हरभजन सिंह KKR कडून खेळणार

  अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहला KKR ने त्याच्या 2 कोटी या बेस प्राईजवर आपल्य ताफ्यात घेतलं आहे.

 • 18 Feb 2021 19:52 PM (IST)

  केदार जाधव हैदराबादकडून खेळणार

  केदार जाधवला अखेर खरेदीदार मिळाला आहे. केदारला त्याच्या 2 कोटींच्या बेस प्राईजवर सनरायजर्स हैदराबादने खरेदी केलं आहे.

 • 18 Feb 2021 19:48 PM (IST)

  बेस प्राइजवर खेळाडू गोटात

  RCB ने सुयश प्रभुदेसाई आणि केएस भरतला 20 लाखांच्या बेस प्राइजवर खरेदी केलं आहे.

  CSK ने एम हरिशंकरला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसच्या आधारावर गोटात दाखल केलं आहे.

  फिरकीपटू कुलदीप यादवला त्याच्या मुळ किमंतीवर म्हणजेच 20 लाख रुपयांमध्ये RR ने ताफ्यात घेतलं आहे.

  तर मुंबई इंडियन्सने 50 लाख मोजून जेम्स निशामला आपल्या गोटात घेतलं. आहे.

   

 • 18 Feb 2021 19:43 PM (IST)

  मॅथ्यू वेड आणि थिसारा परेरा अनसोल्ड

  ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड आणि श्रीलंकेचा थिसारा परेरा हे दोघेही अनसोल्ड राहिले आहेत. मॅथ्यू वेडची 1 कोटी तर परेराची 20 लाख इतकी बेस प्राईज होती.

 • 18 Feb 2021 19:40 PM (IST)

  डॅनियल क्रिश्चियन अखेर RCB कडे

  डॅनियल क्रिश्चियनला आपल्या गोटात घेण्यासाठी kkr आणि rcb मध्ये चढाओढ पाहायला मिळाली. पण अखेर बंगळुरु डॅनियलला आपल्याकडे घेण्यात यशस्वी ठरली. बंगळुरुने डॅनियलसाठी 4.8 कोटी मोजले. डॅनियलची मुळ किमंत ही 75 लाख इतकी होती.

 • 18 Feb 2021 19:34 PM (IST)

  फॅबियन एलन पंजाबच्या ताफ्यात

  वेस्टइंडिजचा खेळाडू फॅबियन एलनला पंजाबने खरेदी केलं आहे. पंजाबने फॅबियनला 75 लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं

 • 18 Feb 2021 19:32 PM (IST)

  वैभव अरोरा कोलकाताच्या गोटात

  वैभव अरोराला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

 • 18 Feb 2021 19:30 PM (IST)

  जलज सक्सेना पंजाबच्या ताफ्यात

  जलज सक्सेनाला पंजाबने त्याच्या बेस प्राईजमध्येच खरेदी केलं आहे. त्याची बेस प्राईज ही 30 लाख इतकी होती. तर उत्कर्ष सिंहलाही त्याच्या 20 लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी करण्यात आलं आहे.

 • 18 Feb 2021 18:41 PM (IST)

  हे गोलंदाज राहिले अनसोल्ड

  वरुण एरॉन , बेस प्राइज- 50 लाख.

  ओशेन थॉमस, बेस प्राइज- 50 लाख.

  मोहित शर्मा, बेस प्राइज- 50 लाख.

  बिली स्टॅनलेक, बेस प्राइज- 50 लाख

  मिचेल मॅक्लॅनघन, बेस प्राइज- 50 लाख

  जेसन बेहरनडॉर्फ, बेस प्राइज -1 कोटी.

  नवीन उल हक, बेस प्राइज- 50 लाख.

 • 18 Feb 2021 18:35 PM (IST)

  मोसेस हेनरिक्स पंजाबच्या गोटात

  ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मोसेस हेनरिक्स (moises henriques) ला पंजाब किंग्सने 4.2 कोटीमध्ये खरेदी केलं आहे.

 • 18 Feb 2021 18:32 PM (IST)

  ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन अनसोल्ड

  ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशने (marnus labuschagne) अनसोल्ड राहिला आहे. त्याची बेस प्राईज 1 कोटी इतकी होती.

 • 18 Feb 2021 18:27 PM (IST)

  अष्टपैलू टॉम करन दिल्लीकडे

  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टॉम करनला (Tom Curran) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आपल्या गोटात घेतलं आहे. दिल्लीने करनसाठी 5 कोटी 25 लाख इतकी रक्कम मोजली आहे.

 • 18 Feb 2021 18:16 PM (IST)

  कायले जेमिसन 15 कोटींसह बंगळुरुच्या ताफ्यात

  न्यूझीलंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनसाठी (kyle jamieson)  रॉयस चॅलेंजर्स बंगळुरुने (rcb) 15 कोटी मोजत त्याला आपल्या  ताफ्यात घेतलं आहे.

 • 18 Feb 2021 18:09 PM (IST)

  चेतेश्वर पुजारा चेन्नईच्या ताफ्यात

  चेतेश्वर पुजाराला चेन्नई सुपर किंग्जसने खरेदी केलं आहे. पुजाराला 2014 नंतर पहिल्यांदाच कोणत्या फ्रँचायजीने खरेदी केलं आहे. पुजाराला त्याच्या बेस प्राईज 50 लाखांमध्ये घेतलं आहे.

 • 18 Feb 2021 18:06 PM (IST)

  मार्टिन गुप्टिल आणि पवन नेगी अनसोल्ड

  मार्टनि गुप्टिल आणि पवन नेगी अनसोल्ड ठरले आहेत. या दोघांना आपल्या ताफ्यात घेण्यास कोणत्याही फ्रँचायजीने रस दाखवला नाही.

 • 18 Feb 2021 17:45 PM (IST)

  एम सिद्धार्थ दिल्लीकडे, तर मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या पदरी निराशा

  दिल्ली कॅपिटल्सने (dc) एम सिद्धार्थ ला 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. तर मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या (Tushar Deshpande Unsold) पदरी निराशा पडली आहे. तो अनसोल्ड राहिला आहे. त्याची बेस प्राईज 20 लाख होती. तुषार गेल्या मोसमात दिल्लीकडून खेळला होता. तर करणवीर सिंहही अनसोल्ड राहिला.

 • 18 Feb 2021 17:38 PM (IST)

  चेतन सकरिया राजस्थानकडे

  राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेतन सकारिया (Chetan Sakariya) ला 1.2 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतलं आहे. सकारियाने 16 टी 20 सामन्यात 28 विकेट्स घेतल्या आहेत.

 • 18 Feb 2021 17:35 PM (IST)

  20 लाखांमध्ये खरेदी केलेले खेळाडू

  विष्णु विनोदला 20 लाखांच्या बेस प्राइजवर दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केलं.

  अनुभवी भारतीय शेल्डन जॅकसनला 20 लाखांमध्ये KKR ने आपल्या ताफ्यात घेतलं.

  सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 37 चेंडूत शतक ठोकणाऱ्या मोहम्मद अजहरुद्दीनला RCB ने 20 लाखांमध्ये घेतलं.

  लुकमान हुसैन मेरीवालासाठी दिल्लीने 20 लाख मोजले.

   

 • 18 Feb 2021 17:27 PM (IST)

  कृष्णप्पा गौतम csk च्या ताफ्यात

  युवा ऑलराउंडर कृष्णप्पा गौतमला (krishnappa gowtham) चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आपल्या ताफ्यात घेतलं आहे. चेन्नईने गौतमसाठी 9 कोटी 25 लाख मोजले आहेत. तो सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. त्याची बेस प्राईजही 20 लाख इतकी होती.

 • 18 Feb 2021 17:20 PM (IST)

  शाहरुख खान पंजाबकडून खेळणार

  देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानला किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्याची बेस प्राईज ही एकूण 20 लाख होती. मात्र त्यासाठी पंजाबने 5 कोटी 25 लाख मोजले. दरम्यान आता शाहरुख पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.

   

 • 18 Feb 2021 17:08 PM (IST)

  Uncapped खेळाडूंचा लिलाव

  Uncapped खेळाडूंचा लिलाव करण्यात येत आहे. रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि सचिन बेबीला (Sachin Baby) बंगळुरुने 20 लाखात  (RCB) खरेदी केलं आहे.

 • 18 Feb 2021 17:00 PM (IST)

  फिरकीपटु पियुष चावला मुंबई इंडियन्सकडे

  मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) फिरकीपटु पियूष चावलाला (Piyush Chawala) आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबईने चावलाला 2 कोटी 40 लाखात घेतलं आहे. चावलाची बेस प्राईज 2 कोटी इतकी होती. चावला आयपीएलमधील यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे.

 • 18 Feb 2021 16:52 PM (IST)

  अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह अनसोल्ड

  अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह अनसोल्ड ठरला आहे. हरभजनची बेस प्राईज 2 कोटी इतकी होती. हरभजन आयपीएलच्या 13 व्या मोसमात वैयक्तिक कारणांमुळे खेळला नव्हता.

 • 18 Feb 2021 16:48 PM (IST)

  शेलडॉन कॉट्रेल अनसोल्ड

  शेल्डॉन कॉट्रेल (Sheldon Cottrell) अनसोल्ड ठरला आहे. गत मोसमात राजस्थानच्या राहुल तेवतियाने कॉट्रेल्चा गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी करत सामना राजस्थानच्या बाजुने झुकवला होता.

 • 18 Feb 2021 16:45 PM (IST)

  नॅथन कुल्टर नाईल मुंबईकडे

  नॅथन कुल्टर नाईलला (Nathan Coulter Nile)  मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 5 कोटी माजून आपल्या ताफ्यात घेतले आहे.

   

 • 18 Feb 2021 16:44 PM (IST)

  झाय रिचर्डसनसाठी पंजाबकडून 14 कोटी

  झाय रिचर्डसनसाठी (jhye richardson) पंजाब किंग्जने (Punjab Kings) 14 कोटीमध्ये आपल्या संघात घेतलं आहे. रिचर्डसनची बेस प्राईज ही 1 कोटी 50 लाख इतकी होती.

 • 18 Feb 2021 16:39 PM (IST)

  मुस्तफिजुर रहमान राजस्थानकडे

  राजस्थानने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला 1.5 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

 • 18 Feb 2021 16:35 PM (IST)

  एडम मलान मुंबईच्या ताफ्यात

  एडम मलानला (Adam Milne) मुंबईच्या (Mumbai Indians) ताफ्यात घेण्यात आलं आहे. एडमसाठी मुंबईने 3 कोटी 20 लाख मोजले आहेत. त्याची बेस प्राईज 50 लाख इतकी होती.

 • 18 Feb 2021 16:28 PM (IST)

  अॅलेक्स कॅरी, सॅम बिलिंग्स आणि कुसल परेरा अनसोल्ड

  अॅलेक्स कॅरी, सॅम बिलिंग्स आणि कुसल परेरा अनसोल्ड राहिले आहेत. या तिघांना घेण्यात कोणत्याही फ्रँचायजीने रस दाखवला नाही.

   

 • 18 Feb 2021 16:22 PM (IST)

  डेव्हिड मलान पंजाबकडे

  इंग्लंडच्या डेव्हिड मलानला (David Malan) पंजाबने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. डेव्हिडला त्याच्या बेस प्राईजमध्येच खरेदी करण्यात आलं आहे.  मलान हा आयसीसीच्या टी 20 रॅकिंगमध्ये (Icc T 20I Ranking) पहिल्या क्रमांकावर आहे. यावरुन तो काय दर्ज्याचा खेळाडू आहे, याचा अंदाज येतो. दरम्यान या 14 व्या मोसमाच्या निमित्ताने मलान पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार आहे.

 • 18 Feb 2021 16:08 PM (IST)

  ख्रिस मॉरीस राजस्थानच्या ताफ्यात, ठरला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू

  ख्रिस मॉरीस (Chris Morris) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ख्रिस मॉरीससाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) तब्बल  16 कोटी 25 लाख मोजले आहेत. मॉरीसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि मुंबई इंडियन्सही स्पर्धेत होती. पण अखेर मोठी रक्कम मोजत मॉरीसला राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलं आहे.  मॉरीसची बेस प्राईजही  75 लाख रुपये इतकी होती.

 • 18 Feb 2021 15:52 PM (IST)

  मुंबईचा ऑलराऊंडर शिवम दुबे राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात

  मुंबईचा ऑलराऊंडर शिवम दुबेला राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटींना घेतले. शिवनची  बेस प्राइस होती 50 लाख. दिल्ली 3.8 कोटी तर हैदराबाद 3.4 कोटी मोजायला तयार होती. पण RR ने बाजी मारली.

 • 18 Feb 2021 15:49 PM (IST)

  मोईन अलीसाठी चेन्नईने मोजले 7 कोटी

  इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीसाठी (Moeen Ali) चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 7 कोटी मोजले आहेत. मोईन अलीची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती. मोईनने टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शेवटी येऊन जोरदार फटकेबाजी केली होती.

 • 18 Feb 2021 15:43 PM (IST)

  बांगलादेशचा शाकिब पुन्हा कोलकाताकडून खेळणार

  बांगलादेशचा ऑलराऊंडर खेळाडू शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आपल्या ताफ्यात घेतलं आहे. शाकिबसाठी केकेआरने  3 कोटी 20 लाख इतकी रक्कम मोजली आहे. शाकिबची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती. दरम्यान शाकिब याआधी कोलकाताकडून खेळला आहे.

 • 18 Feb 2021 15:39 PM (IST)

  मराठमोळा केदार जाधव अनसोल्ड

  मराठमोळा केदार जाधव अनसोल्ड ठरला आहे. केदारला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोणची स्वारस्य दाखवलं नाही. केदारची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती.

   

 • 18 Feb 2021 15:35 PM (IST)

  मॅक्सवेलसाठी बंगळुरुकडून 14 कोटी 25 लाख

  अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आपल्या ताफ्यात घेतलं आहे. बंगळुरुने मॅक्सवेलसाठी तब्बल 14 कोटी 25 लाख इतकी रक्कम मोजली आहे. मॅक्सवेलची बेस प्राईज 2 कोटी इतकी होती. मॅक्सवेलला 2020 मध्ये पंजाबने 10 कोटी 75 लाखांमध्ये आपल्या संघात घेतलं होतं.

   

   

 • 18 Feb 2021 15:29 PM (IST)

  मॅक्सवेलसाठी फ्रँचायजींमध्ये रस्सीखेच

  ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसाठी (Glenn Maxwell) फ्रँचाजींमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. सर्व फ्रँचायजी मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुक आहेत. मॅक्सवेलला पंजाबने रिलीज केलं होतं. त्याची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी आहे.

 • 18 Feb 2021 15:25 PM (IST)

  अ‍ॅरोन फिंचवर कोणीच बोली लावली नाही

  ऑस्ट्रेलियाचा टी -20 कर्णधार अ‍ॅरोन फिंचला (Aaron Finch) आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोणत्याही फ्रँचायजीने रस दाखवला नाही. फिंचची बेस प्राईज ही 1 कोटी इतकी होती.

 • 18 Feb 2021 15:19 PM (IST)

  स्टीव्ह स्मिथ दिल्लीकडून खेळणार

  ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज असलेल्या स्टीव्ह स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतलं आहे.  दिल्लीने स्मिथसाठी  2.2 कोटी  मोजले आहेत. स्मिथची 2 कोटी इतकी बेस प्राईज होती.

 • 18 Feb 2021 15:16 PM (IST)

  अॅलेक्स हेल्स, जेसन रॉय अनसोल्ड

  अॅलेक्स हेल्स, जेसन रॉय आणि  करुन नायर अनसोल्ड राहिले आहेत. त्यांना आपल्या ताफ्यात घेण्यात कोणत्याही फ्रँचायजीने स्वारस्य दाखवले नाही.

 • 18 Feb 2021 15:12 PM (IST)

  IPLचे प्रायोजकत्व VIVO ला

  आयपीएलचं प्रायोजकत्व हे पुन्हा विवो (vivo) ला देण्यात आलं आहे. सीमेवरील वाढलेल्या तणावानंतर विवोसोबत 2020 मध्ये करार स्थगित करण्यात आला होता.

 • 18 Feb 2021 14:50 PM (IST)

  लिलावात क्रिकेटपटू सेहवागच्या पुतण्याची एंट्री

  लिलावाच्या अवघ्या काही मिनिटांआधी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा पुतण्या मयंक डागरला एंट्री मिळाली आहे. म्हणजेच आता मयंकवर बोली लागणार आहे. मयंकने 23 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 64 तर 31 टी 20 मॅचेसमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत. मयंकशिवाय ऑस्ट्रेलियाच्या जेवियर बार्लेट, पुड्डुचेरीच्या के डी रोहित, केरळचा केके जियास, राजस्थान रॉयल्सचा अशोक मेनारिया आणि उत्तर प्रदेशचा फिरकीपटू सौरभ कुमार यांनाही लिलावासाठी शॉर्ट लिस्टेड करण्यात आले आहे.

 • 18 Feb 2021 14:41 PM (IST)

  थोड्याच वेळात लिलावाला सुरुवात

  लिलावाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही मिनिटं उरले आहेत. सर्व फ्रँचायजींचे प्रतिनिधी हे ऑक्शन हॉलमध्ये दाखल झाले आहेत.

 • 18 Feb 2021 14:26 PM (IST)

  चेन्नईच्या फ्रँचायजीचे प्रतिनिधी ऑक्शन हॉलमध्ये दाखल

  लिलावासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रँचायजीचे संबंधित व्यक्ती हे ऑक्शन हॉलमध्ये पोहचले आहेत. या सर्व व्यक्तींनी आपल्या तोडांवर 7 नंबर असलेला मास्क घातला आहे. 7 हा धोनीच्या जर्सचा नंबर आहे.

 • 18 Feb 2021 14:23 PM (IST)

  अर्जुन तेंडुलकरवर क्रिकेट विश्वाचं लक्ष

  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही या लिलाव प्रक्रियेत आहे. त्याची बेस प्राईज ही 20 लाख इतकी  आहे. अर्जुनला कोणत्या संघाकडून संधी मिळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 • 18 Feb 2021 14:20 PM (IST)

  या खेळाडूंवर असणार फ्रँचायजीची नजर

  या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल, अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह आणि केदार जाधव यांच्यावर सर्व फ्रँचायजींचं लक्ष असणार आहे. या खेळाडूंना कोणता संघ आपल्या ताफ्यात घेणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

 • 18 Feb 2021 14:14 PM (IST)

  मार्क वुडची माघार

  इंग्लंडचा वेगवाग गोलंदाज मार्क वुडने लिलावाच्या एकदिवसाआधी आपलं नाव मागे घेतलं. वुडने वैयक्तिक कारणाने आपलं नाव माग घेतलं. वुडची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती.

 • 18 Feb 2021 14:11 PM (IST)

  लिलावात सर्वाधिक ऑस्ट्रेलियाचे खेळाडू

  या लिलावात एकूण 292 खेळाडू सहभागी आहेत. यामध्ये सर्वाधिक 128 हे परदेशी खेळाडू आहेत. या परदेशी खेळाडूंपैकी सर्वाधिक खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचे एकूण 35 खेळाडू आहेत. तर न्यूझीलंडचे 20 तर वेस्टइंडिजचे 19 खेळाडू आहेत.

 • 18 Feb 2021 13:46 PM (IST)

  मुंबई इंडियन्सचं मराठी ट्विट

  मुंबई इंडियन्स या लिलावासाठी सज्ज आहे. पलटण, तयार का? असं मुंबईच्या समर्थकांना मराठीत प्रश्न विचारणारं ट्विट मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅंडलवरुन करण्यात आलं आहे.

  मुंबई इंडियन्सने केलेलं ट्विट

 • 18 Feb 2021 13:37 PM (IST)

  थोड्याच वेळात लिलावाला सुरुवात

  आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच्या लिलावाला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. हा लिलाव चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमध्ये पार पडणार आहे.

  ऑक्शनबद्दल केलेलं ट्विट