IPL Mumbai Indians Team 2021 | वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूसह अनेक अनुभवी खेळाडू, पाहा मुंबई इंडियन्सची टीम

आयपीएल 2021 च्या लिलावातून IPL Auction 2021 मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एकूण 7 खेळाडू खरेदी केले.

IPL Mumbai Indians Team 2021 | वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूसह अनेक अनुभवी खेळाडू, पाहा मुंबई इंडियन्सची टीम
मुंबई इंडियन्सने (mumbai indians) एकूण 7 खेळाडूंना आपल्या गोटात घेतलं आहे.
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 11:43 AM

चेन्नई : आयपीएलच्या आगामी 14 व्या पर्वासाठीचा लिलाव 18 फेब्रुवारीला (IPL Auction 2021) चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला इथे पार पडला. या बोली कार्यक्रमात विविध फ्रँचायजींनी एकूण 57 खेळाडू खरेदी केले. आयपीएलमधील यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या लिलावातून मोजकेच पण महत्वाचे खेळाडू आपल्याकडे घेतले. मुंबईने एकूण 7 खेळाडूंना आपल्या गोटात घेतलं आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) समावेश आहे. तसेच टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या पियुष चावलाचाही (Piyush Chawala) यामध्ये समावेश आहे. मुंबईने कोणत्या खेळाडूंना किती रक्कम मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे, हे आपण बघुयात. (ipl auction 2021 mumbai indians team see full players list 2021)

मुंबईने लिलावातून आपल्या ताफ्यात घेतलेले खेळाडू

अॅडम मिल्न (न्यूझीलंड) 3.20 कोटी रुपये.

न्यूजीलंडचा वेगवान गोलंजदाज अॅडन मिल्न हा 14 व्या मोसमात मुंबईच्या ताफ्यात येणारा पहिला खेळाडू ठरला. मिल्नची बेस प्राइस 50 लाख इतकी होती. पण मुंबईने त्याच्यासाठी 3 कोटी 20 लाख रुपये मोजले.

नॅथन कुल्टर नाइल (ऑस्ट्रेलिया), 5 कोटी रुपये.

पीयूष चावला (भारत), 2.2 कोटी रुपये.

युद्धवीर चरक (भारत), 20 लाख रुपये.

मार्को जॅनसन (दक्षिण आफ्रिका), 20 लाख रुपये.

अर्जुन तेंडुलकर ( भारत), 20 लाख रुपये.

जेमी निशाम (न्यूजीलंड), 50 लाख रुपये.

मुंबईने आपल्या गोटात लिलावातून एकूण 7 खेळाडू घेतले. त्यापैकी न्यूझीलंड 2, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 1 आणि भारताचे 3 खेळाडू आहेत. यामध्ये सचिन तेडुंलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. मुंबईने अर्जुनला त्याच्या 20 लाख या बेस प्राईजवर खरेदी केलं.

मुंबई इंडियन्सने कायम राखलेले खेळाडू : रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, आदित्‍य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेन्ट बोल्‍ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, ख्रिस लिन, राहुल चाहर, हार्दिक पांड्या, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, अनुकूल रॉय आणि इशान किशन.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 13 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईकडून यावेळेसही विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

रोहित अनुभवी आणि यशस्वी कर्णधार

रोहित आयपीएल स्पर्धेतील यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार आहे. रोहित 2013 पासून म्हणजेच गेल्या 8 मोसमांपासून मुंबईचे नेतृत्व करतोय. यामध्ये त्याने मुंबईला 8 पैकी 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित कॅपटन्सीसोबत एक अफलातून फलंदाजदेखील आहे.

संबंधित बातम्या :

IPL Rajasthan Royals Team 2021 | ख्रिस मॉरिसकडून रेकॉर्ड ब्रेक, विराटचा ‘हा’ खेळाडूही ताफ्यात, पाहा राजस्थानची टीम

IPL Auction 2021 Highlights | ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

IPL Auction 2021 Mumbai Indians Live Updates | सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबईच्या ताफ्यात

(ipl auction 2021 mumbai indians team see full players list 2021)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.