IPL Rajasthan Royals Team 2021 | ख्रिस मॉरिसकडून रेकॉर्ड ब्रेक, विराटचा ‘हा’ खेळाडूही ताफ्यात, पाहा राजस्थानची टीम

राजस्थान रॉयल्सने (Ipl Auction 2021) लिलावातून एकूण 8 खेळाडू खरेदी केले.

IPL Rajasthan Royals Team 2021 | ख्रिस मॉरिसकडून रेकॉर्ड ब्रेक, विराटचा 'हा' खेळाडूही ताफ्यात, पाहा राजस्थानची टीम
राजस्थानने (Ipl Auction 2021) लिलावातून एकूण 8 खेळाडू खरेदी केले.
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 10:45 AM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव (Ipl Auction 2021)  18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडला. या लिलावात एकूण 57 खेळाडूंना विविध फ्रँचायजींनी आपल्या ताफ्यात घेतलं. या बोली प्रक्रियेत राजस्थान रॉयल्सने अष्टपैलू ख्रिस मॉरिसला सर्वाधिक किंमत मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. राजस्थानने मॉरिससाठी एकूण 16 कोटी 25 लाख मोजले. यासह मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू ठरला. त्याने कमाईबाबात युवराज सिंहला पछाडलं. युवराज सिंहला 2015 मध्ये दिल्लीने 16 कोटी खर्चून आपल्याकडे घेतलं होतं. (ipl auction 2021 rajasthan royals team see full players list)

विराटच्या ताफ्यातील खेळाडू राजस्थानकडे

राजस्थानने विराटच्या बंगळुरुकडे असलेल्या मुंबईकर ऑलराऊंडर शिवम दुबेलाही खरेदी केलं. राजस्थानने शिवमसाठी 4 कोटी 40 लाख इतकी रक्कम मोजली. यासह शिवम तिसरा महागडा भारतीय खेळाडू ठरला. शिवमची बेस प्राईज ही 50 लाख इतकी होती.

राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसनकडे

या आगामी मोसमापासून राजस्थानच्या (Rajasthan Royals) नेतृत्वाची जबाबदारी ही युवा संजू सॅमसनकडे (Sanju Samson) असणार आहे. आयपीएलच्या 13 व्या मोसमात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) राजस्थानचा कर्णधार होता. पण त्याला आपल्या नेतृत्वात राजस्थानला प्ले ऑफमध्ये पोहचवता आले नाही. तो अपयशी ठरला. त्यामुळे राजस्थानने स्मिथलाही रिलीज केलं. त्यामुळे आता या पर्वात संघातील स्मिथची जागा कोण भरणार, त्याची उणीव कोण भरुन काढणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

दरम्यान राजस्थानने या लिलावातून एकूण 8 खेळाडू खरेदी केले. या खेळाडूंना किती रक्कम मोजून आपल्या गोटात घेतलं हे आपण पाहुयात.

1. शिवम दुबे, 4.4 कोटी रुपये

2. ख्रिस मॉरिस, 16.25 कोटी रुपये

3. मुस्‍ताफिजुर रहमान, 1 कोटी रुपये

4. चेतन सकारिया, 1.2 कोटी रुपये

5. केसी करियप्‍पा, 20 लाख रुपये

6. लियाम लिविंगस्‍टोन, 75 लाख रुपये

7. कुलदीप यादव, 20 लाख रुपये

8. आकाश सिंह, 20 लाख रुपये

राजस्थानने कायम राखलेले खेळाडू : संजू सॅमसन, बेन स्‍टोक्‍स, यशस्‍वी जयस्वाल, अनुज रावत, एंड्रयू टाई, कार्तिक त्‍यागी, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमरोर, डेव्हिड मिलर, जोस बटलर, मनन वोहरा, रियान पराग.

संबंधित बातम्या :

IPL Auction 2021 Highlights | ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

अर्जुन तेंडुलकरवर 20 लाखांची बोली, कोणत्या संघाकडून खरेदी?

Chris Morris | बेस प्राईज अवघी 75 लाख, मात्र ख्रिस मॉरिसला IPL इतिहासातील सर्वात मोठी किंमत!

(ipl auction 2021 rajasthan royals team see full players list)

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.