AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chris Morris | बेस प्राईज अवघी 75 लाख, मात्र ख्रिस मॉरिसला IPL इतिहासातील सर्वात मोठी किंमत!

Chris Morris the most expensive player IPL : दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने (Chris Morris) आयपीएलच्या हंगामात (IPL Auction) इतिहास रचला आहे.

Chris Morris | बेस प्राईज अवघी 75 लाख, मात्र ख्रिस मॉरिसला IPL इतिहासातील सर्वात मोठी किंमत!
Chris Morris the most expensive player
| Updated on: Feb 18, 2021 | 4:24 PM
Share

चेन्नई : दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने (Chris Morris) आयपीएलच्या हंगामात (IPL Auction) इतिहास रचला आहे. ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली (Chris Morris IPL bid price) लागली आहे. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. मॉरीसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि मुंबई इंडियन्सही स्पर्धेत होती. पण अखेर मोठी रक्कम मोजत मॉरीसला राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मॉरिसची बेस प्राईजही 75 लाख रुपये इतकी होती.

ख्रिस मॉरिस (Chris Morris)

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chris Morris) आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत होता. मॉरिसने 13 व्या मोसमात एकूण 9 सामन्यात त्याने 6.63 च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या होत्या. मॉरिस ऑलराऊंड प्लेअर आहे. टी 20 सारख्या छोट्या प्रकारात सर्व आघाड्यांवर दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूची आवश्यकता असते. ते सर्व गुण मॉरिसमध्ये आहेत.

आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू

2008-महेंद्रसिंग धोनी (6 कोटी)

2009-अँड्यू फ्लिनटॉफ आणि केव्हिन पीटरसन (प्रत्येकी 7.35 कोटी)

2010-कायरेन पोलार्ड आणि शेन बाँड (प्रत्येकी 3.4 कोटी)

2011- गौतम गंभीर (11.4 कोटी)

2012-रवींद्र जडेजा (9.72 कोटी)

2013-ग्लेन मॅक्सवेल (5.3 कोटी)

2014-युवराज सिंग (14 कोटी)

2015-युवराज सिंग (16 कोटी)

2016- शेन वॉटसन (9.5 कोटी)

2017-बेन स्टोक्स (14.5 कोटी)

2018-बेन स्टोक्स (12.50 कोटी)

2019-जयदेव उनाडकत आणि वरुण चक्रवर्ती (प्रत्येकी 8.4 कोटी)

2020-पॅट कमिन्स (15.5 कोटी)

14 व्या मोसमाचं आयोजन कुठे?

कोरोनामुळे 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. यामुळे आयपीएलच्या आगामी 14 पर्वाचं आयोजन कुठे होणार, हा मोठा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनावर लस सापडल्यास नक्कीच या आगामी पर्वाचं आयोजन भारतात केलं जाईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काही महिन्यांपूर्वी व्यक्त केला होता. आता कोरोना लस सापडली आहे. यामुळे या 14 मोसमाचं आयोजन हे नक्कीच भारतात केलं जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या  

विराट कोहलीच्या बंगळुरुने पेटारा उघडला, ग्लेन मॅक्स्वेलसाठी मोजले 14,25,00,000 रुपये

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.