IPL 2022 स्पर्धेला झटका, ‘हे’ स्टार क्रिकेटर्स नाही खेळणार, मेगा ऑक्शनमध्ये नाही दिलं नाव

| Updated on: Jan 22, 2022 | 3:09 PM

आयपीएलच्या मेगा ऑक्शनची (IPL Mega Auction) जवळपास तयारी पूर्ण झाली आहे. सगळ्याच संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे.

1 / 5
आयपीएलच्या मेगा ऑक्शनची (IPL Mega Auction) जवळपास तयारी पूर्ण झाली आहे. सगळ्याच संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे. लीगमध्ये सहभागी झालेल्या दोन नव्या संघांनीही आपल्या निवडलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक मोठी नावं ऑक्शनमध्ये दिसणार नाहीत.

2 / 5
ख्रिस गेल यंदाच्या ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाहीय. गेल 'सिक्सर किंग' म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये गेलने आतापर्यंत 4965 धावा केल्या आहेत. धडाकेबाज फलंदाजीसाठी ख्रिस गेल ओळखला जातो. मेगा ऑक्शन आधी किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी रिलीज केलं आहे.

3 / 5
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाहीय. मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळला आहे. त्याची इकोनॉमी 7.17 असून 17.06 च्या स्ट्राइकने 34 विकेट काढल्यात. कोलकाता नाइट रायडर्सशिवाय तो आरसीबीसाठी सुद्धा खेळला आहे.

4 / 5
राजस्थान रॉयल्सचे स्टार खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर सुद्धा यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाहीत. दुखापतीचा धोका असल्यामुळे इंग्लंडच्या दोन्ही खेळाडुंनी आपलं नाव मागे घेतलय. दोन्ही खेळाडुंनी मागच्या सीजनमध्ये राजस्थानसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

5 / 5
इंग्लंडचे स्टार युवा खेळाडू सॅम करण आणि ख्रिस वोक्स यांनी सुद्धा आयपीएलपासून लांब राहण्याचा निर्णय घेतलाय. सॅम करण चेन्नई सुपर किंग्जसाठी तर वोक्स दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतो. करणला मागच्या सीजनमध्ये मध्यावरच आयपीएल सोडून मायदेशी परताव लागलं होतं. कारण तो दुखापतग्रस्त झाला होता. दोघे का सहभागी होत नाहीयत, ते कारण अजून समोर आलेलं नाही.