IPL 2023: रातोरात IPL च्या 5 कोट्यधीश खेळाडूंच संपलं करियर, कोण आहे ते प्लेयर?

| Updated on: Nov 16, 2022 | 1:52 PM

IPL 2023: काल हिरो होते, पण आता काय करणार? पुढच्या प्रवास कसा असेल?

IPL 2023: रातोरात IPL च्या 5 कोट्यधीश खेळाडूंच संपलं करियर, कोण आहे ते प्लेयर?
ipl
Image Credit source: ipl
Follow us on

मुंबई: सर्वच 10 टीम्सनी आयपीएल 2023 साठी पहिलं पाऊल उचललय. मिनी ऑक्शनमध्ये उतरण्याआधी आपल्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केलय. रिटेंशन आणि रिलीजनंतर काही खेळाडू असे आहेत, ज्यांच्या IPL करियरवर ग्रहण लागलय. म्हणजे प्लेयर म्हणून करियर जवळपास संपल्यात जमा आहे.

IPL 2023 आधी ज्या खेळाडूंच्या करियरवर ग्रहण लागलय, ते साधेसुधे नाहीत. आयपीएल लीगमधील ते कोट्यधीश क्रिकेटपटू आहेत. त्या खेळाडूंच्या करियवर एक नजर टाकूया.

पोलार्डला आता किती रक्कम मिळणार?

आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्स आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जारी करणार होती. त्याआधीच पोलार्डने कायरन पोलार्डने आयपीएलमध्ये निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल 2022 मध्ये कायरन पोलार्डसाठी मुंबई इंडियन्सने 6 कोटी रुपये मोजले होते. बॅटिंग कोच म्हणून पोलार्ड मुंबई इंडियन्ससाठी काम करणार आहे. त्याला आता किती रक्कम मिळेल, हे स्पष्ट नाहीय.

4.40 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं

ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्जसाठी मॅचविनर होता. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची बेस प्राइस 2 कोटी रुपये होती. सीएसकेने आयपीएल 2022 ऑक्शनमध्ये त्याला 4.40 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. आयपीएल 2023 मध्ये ब्राव्हो आता सीएसकेच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार नाही. सीएसकेने त्याला रिलीज केलय. ब्राव्होच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर आता ग्रहण लागलय.

त्याच्यावर आता कोण बोली लावणार?

CSK ने रॉबिन उथप्पाला बेस प्राइस 2 कोटी रुपयात आयपीएल 2022 च्या ऑक्शनमध्ये विकत घेतलं होतं. आयपीएल 2023 आधी चेन्नईने त्याला रिलीज केलं. आता रॉबिन उथप्पावर कुठल्या टीमकडून बोली लावली जाण्याची शक्यता कमी आहे.

केकेआरने त्याला रिलीज केलं

लखनौ सुपर जायंट्सने मनीष पांडेला 4.60 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्याची बेस प्राइस 1 कोटी रुपये होती. आयपीएल 2023 आधी LSG ने त्याला रिलीज केलय. त्याच्याही आयपीएल करियरला ग्रहण लागू शकतं.

अजिंक्य रहाणेची बेस प्राइस 1 कोटी रुपये होती. केकेआरने त्याला त्याचा प्राइजमध्ये विकत घेतलं होतं. तो आयपीएल 2022 मध्ये जास्त खेळला नाही. आता आयपीएल 2023 आधी केकेआरने त्याला रिलीज केलय. रहाणेच करीयर आयपीएलमध्ये नव्या उंचीवर जाण्याची शक्यता आता कमी आहे.