IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपसाठी चुरशीची लढाई, फक्त एका धावेचं अंतर! कोण कुठे जाणून घ्या

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : ऑरेंज कॅपची शर्यत आता चुरशीची होत चालली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानात फक्त एका धावेचे अंतर आहे. ऋतुराज गायकवाडने 21 चेंडूत 32 धावा केल्या. मात्र विराट कोहलीला मागे टाकण्यात अपयश आलं.

IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपसाठी चुरशीची लढाई, फक्त एका धावेचं अंतर! कोण कुठे जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 11:39 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत रविवारी पार पडलेल्या दोन सामन्यानंतर बरीच उलथापालथ झाली आहे. गुणतालिका, ऑरेंज आणि पर्पल कॅपवरही याचा परिणाम दिसून आला आहे. चेन्नई सुपर किंग्सने पंजाबला, कोलकात्याने लखनौला पराभूत केलं. यामुळे बरंच चित्र बदललं आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तर फक्त एका धावेचं अंतर दिसून आलं आहे. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 9 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पंजाब किंग्सला काही गाठता आलं नाही. पंजाब किंग्सने 20 षटकात 9 गडी गमवून 139 धावा केल्या. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने 21 चेंडूत 32 धावा केल्या. यात एक षटकार आणि 4 चौकार मारले. मात्र एका धावेने ऑरेंज कॅप हुकली. कारण विराट कोहली आणि ऋतुराजमध्ये फक्त एका धावेचं अंतर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा रनमशिन्स विराट कोहली 542 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याने 11 सामन्यात ही धावसंख्या उभारली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 11 सामन्यात 541 धावा केल्या आहेत. सुनील नरीनही या रेसमध्ये आला आहे. लखनौ विरुद्ध 81 धावांची खेळी करत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने 11 सामन्या त 461 धावा केल्या आहेत. केएल राहुल चौथ्या स्थानावर असून त्याने 431 धावा केल्या आहेत. फिल सॉल्टने 429 धावा केल्या असून पाचव्या स्थानी आहे. आता ही शर्यत पुढे जाऊन आणखी चुरशीची होणार आहे. सोमवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात कोण कशी कामगिरी करतो आणि टॉप 5 मध्ये कोण येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.