IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीच किंग्स, सूर्यकुमारच्या शतकानंतर काय झालं वाचा

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यानंतरही विराट कोहलीचं स्थान अबाधित आहे. तसं पाहिलं तर हैदराबादच्या ट्रेव्हिस हेडकडे संधी आहे. पण या सामन्यात तितकं अंतर गाठणं कठीण आहे. 48 धावा करूनही जवळपास पोहोचला नाही.

IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीच किंग्स, सूर्यकुमारच्या शतकानंतर काय झालं वाचा
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 11:15 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 55 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच सनरायझर्स हैदराबादला 20 षटकात 8 गडी गमवून 173 धावा केल्या. या विजयी धावा मुंबई इंडियन्सने 3 गडी गमवून पूर्ण केलं. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमारने शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतरही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत फार काही बदल झालेला नाही. सूर्यकुमार यादव 334 धावांसह 16 व्या स्थानावर आहे. विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर कायम आहे. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात फक्त एका धावेचं अंतर आहे. त्यामुळे विराट आणि ऋतुराजमध्येच ऑरेंज कॅपची शर्यत चुरशीची होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या सामन्यानंतरही इतक्या टॉपला पोहोचणं तरी कठीण आहे. त्यामुळे या सामन्यानंतरही विराट कोहलीच टॉपला असेल यात शंका नाही.

विराट कोहलीने 11 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या जोरावर 542 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड आहे. त्याने 11 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या जोरावर 541 धावा केल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरीनने 11 सामन्यात 461 धावा केल्या असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज ट्रेव्हिस हेडचं अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मात्र खूपच लांब आहे. 10 सामन्यात त्याने एकूण 444 धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 11 सामन्यात 3 अर्धशतकांच्या जोरावर 431 धावा केल्या आहे. त्यामुळे टॉपचे दोन खेळाडू वगळता इतर खेळाडूंना ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.