IPL 2022 Points Table: दिल्ली जिंकली, पॉइंटस टेबलची शर्यत अजून रंगतदार, मिचेल मार्शची मॅच विनिंग इनिंग पहा VIDEO

| Updated on: May 11, 2022 | 11:39 PM

IPL 2022 Points Table: दिल्लीने राजस्थानवर विजय मिळवल्यामुळे पॉइंटस टेबलची शर्यत इंटरेस्टिंग झाली आहे. दिल्लीची टीम टॉप फोरमध्ये नाहीय.

IPL 2022 Points Table: दिल्ली जिंकली, पॉइंटस टेबलची शर्यत अजून रंगतदार, मिचेल मार्शची मॅच विनिंग इनिंग पहा VIDEO
dc win over rr
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सने आज राजस्थान रॉयल्सवर (DC vs RR) आठ विकेट राखून विजय मिळवला. प्लेऑफ मधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. ‘करो या मरो’ सामन्यात मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि डेविड वॉर्नर (David Warner) दिल्लीच्या विजयाचे नायक ठरले. मिचेल मार्शची बॅट आयपीएलमध्ये खूप दिवसांनी तळपली. त्याने 62 चेंडूत 89 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि सात षटकार होते. डेविड वॉर्नर आक्रमक खेळण्यासाठी ओळखला जातो. पण वॉर्नरने आज थोडी संयमी वनडे स्टाइल फलंदाजी केली. त्याने 41 चेंडूत 52 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. दिल्लीला दुसऱ्याच चेंडूवर पहिला झटका बसला. ट्रेंट बोल्टने श्रीकर भारतला शुन्यावर झेलबाद केलं. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्शने वॉर्नरच्या साथीने डाव सावरला. मार्शने एकाबाजूने हल्लाबोल केला, तर वॉर्नरने दुसऱ्याबाजूने साथ दिली. दोघांनी दुसऱ्याविकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने दोन षटकार ठोकून दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्त केलं. त्याने नाबाद 13 धावा केल्या. 18.1 षटकात दिल्लीने हा सामना जिंकला.

प्लेऑफची शर्यत रंगतदार

दिल्लीने राजस्थानवर विजय मिळवल्यामुळे पॉइंटस टेबलची शर्यत इंटरेस्टिंग झाली आहे. दिल्लीची टीम टॉप फोरमध्ये नाहीय. दिल्लीचा संघ पाचव्या स्थानावर आहे. पण दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. दिल्लीचे अजून दोन सामने बाकी आहे. आरसीबी 14 पॉइंटससह चौथ्या स्थानावर आहे.


राजस्थानने आजचा सामना जिंकला असता, तर लखनौशी बरोबरी करुन प्लेऑफच्या दिशेने त्यांचं आणखी एक पाऊल पडल असतं. 14 पॉइंटसह ते अजूनही तिसऱ्या स्थानावर आहेत. दिल्लीचा विजय राजस्थानच्या पराभवामुळे पॉइंटस टेबलची शर्यत अजून रंगतदार झाली आहे. एसआरएच, पंजाब, मुंबई आणि सीएसके या संघांचे प्रत्येकी तीन सामने अजूनही बाकी आहेत. त्यामुळे अन्य संघांचे जय-पराजयही महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या तरी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त लखनौचा संघ सुरक्षित आहे.

मिचेल मार्शची मॅच विनिंग इनिंग पहा VIDEO

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स

14104200.316
राजस्थान रॉयल्स
1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

अश्विनची हाफ सेंच्युरी

नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये IPL 2022 स्पर्धेतला 58 वा सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने आज प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सहा बाद 160 धावा केल्या होत्या. रविचंद्रन अश्विन (50) आणि देवदत्त पडिक्कलच्या (48) फलंदाजीच्या बळावर राजस्थानने दिल्लीला विजयासाठी 161 धावांचे टार्गेट दिलं होतं.