IPL Points Table 2024 : आरसीबी हरली पण झटका बसला राजस्थानला, केकेआरची पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप

IPL Points Table 2024 : आयपीएलमध्ये केकेआर आणि आरसीबी सामन्यामध्ये सात विकेटने सलग दुसरा विजय केकेआरने मिळवला आहे. या सामन्यामध्ये मिळवलेल्या विजयासह केकआरने पॉईंट टेबवलमध्ये झेप घेतली आहे.

IPL Points Table 2024 : आरसीबी हरली पण झटका बसला राजस्थानला, केकेआरची पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 1:09 AM

आयपीएल 2024 मधील शुक्रवारी झालेल्या दहावा सामना आरसीबी आणि केकेआरमध्ये झाला. हा सामना बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमध्य पार पडला. या सामन्यामध्ये आरसीबी संघावर केकेआरने सात  विकेटने विजय मिळवला. हा सामना आरसीबीच्या होम ग्राऊंडवर होता, आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिले तर सलग नऊ सामने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघाने जिंकले होते. आजच्या सामन्यात हा रेकॉर्ड मोडला गेला. आररसीबी संघाला पराभूत करत केकेआरने आपला सलग दुसरा विजय मिळवला आहे.  या विजयासह केकेआरने पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.

संघसामनेविजय पराजयनेट रनरेटगुण
राजस्थान रॉयल्स330+1.249 6
कोलकाता नाईट रायडर्स220+1.0474
चेन्नई सुपर किंग्स 3210.9764
गुजरात टायटन्स321-0.7384
सनरायझर्स हैदराबाद312+0.2042
लखनऊ सुपर जायंट्स2110.0252
दिल्ली कॅपिटल्स212-0.016 2
पंजाब किंग्स3120.3372
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु312-0.7112
मुंबई इंडियन्स 303-1.4230

आजच्या सामन्यात सलग दुसरा विजय मिळवत केकेआर संघाचे 4 गुण झाले आहेत. त्यासोबतच नेट रनरेटमध्येही चांगली सुधारणा झाली आहे. या विजयामुळे +1.047 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र याचा तोटा राजस्थान संघाला झाला आहे. कारण केकेआरने मिळवलेल्या विजयामुळे त्यांनी दुसऱ्या स्थानी झेप घेतली आणि राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

गोलंदाजसामनेइकॉनोमीविकेट्स
मुस्तफिझुर रहमान38.83 7
मयंक यादव35.126
युजवेंद्र चहल35.506
मोहित शर्मा37.756
खलील अहमद48.186

आत पॉईंट टेबलमध्ये सीएसके एक नंबरला गेला आहे पण केकेआर आणि राजस्थान यांचेही ४ गुण झाले आहेत. त्यामुळे सर्व संघाना विजयासह नेट रनरेटवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण जेव्हा स्पर्धा अंतिम टप्प्यात जाते तेव्हा रन रेटच्या आधारावर क्लालिफाई होण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक संघाला सामना मोठ्या फरकाने हरून चालणार नाही.

केकेआर आणि आरसीबी सामन्याचा धावता आढावा

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 182-6 धावा केल्या होत्या. यामध्ये विराट कोहली याने 83 धावांची अर्धशतकी खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून सुनील नारायण 47 आणि व्यंकटेश अय्यर 50 धावा करत सामना जिंकवला.

प्लेयर्ससामनेस्ट्राईक रेटरन्स
विराट कोहली4140.97203
रियान पराग3160.17181
हेनरिक क्लासेन3219.73167
शुबमन गिल4159.22164
साई सुदर्शन4160128.00

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

Non Stop LIVE Update
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.