अजित पवार असोत की मी, आम्ही सगळे घराणेशाहीचाच भाग आहोत – सुप्रिया सुळेंनी सुनावलं

बारामतीत पवार कुटुंबातच लढाई होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. स्वत: अजित पवार यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तर मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामतीमध्ये कोण बाजी मारतयं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

अजित पवार असोत की मी, आम्ही सगळे घराणेशाहीचाच भाग आहोत - सुप्रिया सुळेंनी सुनावलं
supriya sule
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 11:14 AM

हा देश कौटुंबिक वादाचा तिरस्कार करतो. म्हणून तुमच्या परिवारवादाच्या, घराणेशाहीच्या भांडणामुळे देशाला का वेठीस धरता असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराणेशाहीवर टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. अजित पवार असो किंवा मी , आम्ही घराणेशाहीचाच भाग आहोत. आमच्या घरात घराणेशाहीच असल्याचं नाकारत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामतीत पवार कुटुंबातच लढाई होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. स्वत: अजित पवार यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तर मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामतीमध्ये कोण बाजी मारतयं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ? 

हा देश कौटुंबिक वादाचा तिरस्कार करतो. म्हणून तुमच्या परिवारवादाच्या, घराणेशाहीच्या भांडणामुळे देशाला का वेठीस धरता असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराणेशाहीवर टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. अजित पवार असो किंवा मी , आम्ही घराणेशाहीचाच भाग आहोत. आमच्या घरात घराणेशाहीच असल्याचं नाकारत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मी असो किंवा अजित पवार किंवा आता सुनेत्रा पवार, आम्ही घराणेशाहीचाच भाग आहोत. शून्यातू विश्वं कोणी उभं केलं ? शरद पवारांनी ! ही बा ध्यानात घ्यावीच लागेल. अजित पवार आणि मी , परिवारवाद (घराणेशाही) आहोतच ना. आम्हाला दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालेलच आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आम्हाला तिघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालं. मी यापूर्वी संसदेतही हे बोललेच आहे, ते नाकारून कसं चालेल, आम्ही सगळे याच घराणेशाहीचा भाग आहोत अस सांगत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिलं.

अतिथी देवो भव

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या राज्यात तीन ठिकाणी सभा आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी ते सोलापूर, पुणे आणि कऱ्हाडमध्ये सभा घेणार आहेत. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अतिथी देवो भव. आपल्याकडे भारतात, प्रत्येक पाहुण्याचं आदराने, सन्मानामे स्वागत केलं जातं. हेच आमचे संस्कार आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी, दमदाटी नको

लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी . पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने मतदान व्हावं. दमदाटी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकांनी विचार, काम आणि मेरिट बघून मतदान करावं असं माझं मत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.