AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : रेहमान डकैतने संशयातून केली आईची हत्या अन्…, पाकिस्तानचा कुख्यात गुंड पण गरिबांसाठी होता रॉबिन हुड… काय आहे पूर्ण कहाणी?

Dhurandhar : रेहमान डकैतची खरी कहाणी... स्वतःच्याच आईची हत्या केली अन्... दारू, ड्रग्स सप्याल आणि वेश्या व्यवसायाचं रॅकेट... पाकिस्तानचा कुख्यात गुंड होता रेहमान पण गरिबांसाठी होता रॉबिन हुड...

Dhurandhar : रेहमान डकैतने संशयातून केली आईची हत्या अन्..., पाकिस्तानचा कुख्यात गुंड पण गरिबांसाठी होता रॉबिन हुड...  काय आहे पूर्ण कहाणी?
Rehman Dakait
| Updated on: Dec 14, 2025 | 10:34 AM
Share

Dhurandhar : ‘रेहमान डकैत की दी हुई मौत बडी कसाईनुमा होती है…’, हा डायलॉग ‘धुरंधर’ सिनेमातील आहे. अभिनेता अक्षय खन्ना याने पाकिस्ताना गुंड रेहमान डकैत याची भूमिका साकारली आणि चाहत्यांनी अभिनेत्याला डोक्यावर देखील घेतलं. पण खऱ्या आयुष्यातील रेहमान प्रचंड भयानक गुंड पण लोकांसाठी रॉबिन हूड होता… रेहमान डकैत फक्त 29 वर्ष जगला… पण त्याने केलेली कृत्य भयानक होती… वयाच्या 15 व्या वर्षी रेहमान याने स्वतःच्या आईची हत्या केली… कुख्यात गुंड असून देखील लोकांमध्ये त्याची लोकप्रियता पोहोचली होती… तर जाणून घ्या काय आहे रेहमान डकैत याची पूर्ण कहाणी…

वयाच्या 13 व्या वर्षी पहिली हत्या…

‘धुरंधर’ सिनेमामुळे पाकिस्तानचा रेहमान चर्चेत आला. सध्या सर्वत्र ‘धुरंधर’ सिनेमाची नाही तर, रेहमान डकैत याच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे. रेहमान याचा जन्म 1980 मध्ये झालेला आणि त्याचे वडील ड्रग्स स्मगलर होते… त्याच्या आईचं नाव खदीजा बीबी असं होतं… लहान असतानाच म्हणजे वयाच्या 13 व्या वर्षापासून त्याने ड्रग्सची तस्करी करण्यास सुरुवात केली आणि 13 व्या वर्षी पहिल्या व्यक्तीची हत्या केली.

संशायामुळे केली आईची हत्या….

वयाच्या 15 व्या वर्षी रेहमान याने स्वतःच्या आईची हत्या केली. रेहमान याला संशय होता की, त्याच्या आईचे दुसऱ्या गँगमधील एका व्यक्तीसोबत संबंध आहेत. तर काही लोकांनी सांगितल्यानुसार, रेहमान याच्या आईने गुप्त रित्या पोलिसांना माहिती दिली… याच कारणामुळे रेहमान याने स्वतःच्याच आईची हत्या केली…

रेहमान डकैत याचे कृत्य…

हळू – हळू रेहमान याचे काळे कृत्य वाढत होते. किडनॅपिंग, स्मगलिंग, उधारी, चोरी… यांसारखी कामे तो करु लागला होता. रिपोर्टनुसार, वयाच्या 21 व्या वर्षी तो एका गँगचा सरदार देखील झालेला. शिवाय तो शस्त्राचा अवैध व्यापार देखील करायचा…

गरिबांचा रॉबिन हूड….

अनेक भयानक कामे करणारा रेहमान गरिबांसाठी मात्र रॉबिन हूड होती… रेहमान सारख्या गुंडा घाबरण्याऐवजी, त्याने लोकांच्या मनावर स्वतःचं राज्य केलं होतं. त्याने गरिबांसाठी शाळा आणि रुग्णालय देखील सुरु केलेले.. तो लोकांची मदत करायचा. पण त्याची टोळी दारू, ड्रग्स सप्याल आणि वेश्या व्यवसायाचं रॅकेट देखील चालवत होती.

रेहमान डकैत याचं मृत्यू

2009 मध्ये रेहमान याचा एनकाउंटर केला. पण त्याच्या मृत्यूचं कारण आज देखील वादाच्या भोवऱ्यात आहे… रिपोर्टनुसार, रेहमान याला 3 फुटांवरून गोळी लागली… एनकाउंटरमध्ये इतक्या लांबून कोणाचा मृत्यू होत नाही… अशी देखील चर्चा आहे की, राजकारणात रेहमान पुढे जाऊ नये म्हणून त्याला बाजूला करण्यात आलं… त्यानंतर रेहमान याला भाऊ उजैर बलोच याने गँग सांभाळली…

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.