Silver Rate: चांदी झाली सोनेरी, पुढील वर्षी पुन्हा मोठी भरारी, गुंतवणूकदारांची पुन्हा चांदी?
Silver Record Break Price: चांदीच्या किंमतीत यंदा आतापर्यंत 120 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. चांदी दोन लाखांच्या घरात पोहचली. तज्ज्ञांच्या मते मागणीत तेजी आणि पुरवठा कमी असल्याने चांदीच्या किंमती 2,40,000-2,50,000 रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदा चांदीन जोरदार बॅटिंग केली आहे. चांदीत जवळपास 120 टक्क्यांची वाढ दिसून आली. या तेजीमुळे शुक्रवारी घरगुती बाजारात चांदीची किंमती पहिल्यांदाच दोन लाखांवर पोहचली. चांदीने किंमतीत 46 वर्षांचा रेकॉर्ड इतिहासजमा केला आहे. 1979 नंतर पहिल्यांदाच चांदीच्या किंमतीत मोठी वाढ दिसली आहे. चांदीत काल मोठी घसरण नोंदवण्यात आली असली तरी चांदी पुढील वर्षी अजून मोठी भरारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षी चांदीची किंमत 2,40,000-2,50,000 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 25% वाढ होण्याची शक्यता आहे.
चांदीच्या किंमतीत तुफान का आले?
INVAsset PMS चे व्यावसाय प्रमुख हर्षल दासानी यांनी मिंटला दिलेल्या प्रतिक्रियानुसार, चांदीच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याने किंमती वाढल्या आहेत. खाणीतून चांदीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी असल्याने चांदीच्या किंमतीत वाढ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारात या किंमती जवळपास 810 दशलक्ष औंसवर स्थिर झाल्या आहेत. जवळपास 70-80 टक्के चांदी शिसे, जस्त आणि तांबे काढताना शुद्ध करण्यात येते. ताज्या आकडेवारीनुसार, चांदीचा पुरवठा पुढील वर्षी 2026 पर्यंत कमीच राहणार आहे. त्यामुळे चांदीची मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशा स्थितीत चांदीच्या किंमतीत तुफान येईल. सध्या सौरऊर्जा संयंत्र आणि इतर अनेक औद्योगिक कारणांसाठी चांदीचा वापर वाढला आहे.
औद्योगिक मागणीत मोठी वाढ
तज्ज्ञांच्या मते औद्योगिक मागणीत मोठी वाढ होत आहे. खासकरुन अक्षय ऊर्जा संयंत्र आणि प्रकल्पासाठी चांदीला मोठी मागणी आहे. सोलर एनर्जी सेक्टरमध्ये चांदीची मागणी गेल्या चार वर्षात दुप्पट झाली आहे. वर्ष 2020 मध्ये मागणी 94.4 दशलक्ष औंस होती. तर 2024 मध्ये ही मागणी वाढून 243.7 दशलक्ष औंसवर पोहचली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी चांदीची मागणी दिवसागणिक वाढत आहे. यंदा या प्रकल्पासाठी चांदीची मागणी 21 टक्क्यांवर पोहचली. बाजारातील अनिश्चितिता, अमेरिकेतील राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता, फेड रिझर्व्हचे व्याज धोरण यामुळे चांदीकडे गुंतवणूकदार सातत्याने वळत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी चांदी भरारी घेण्याची शक्यात आहे. गुंतवणूकदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
