Gold And Silver Price: गुडन्यूज! चांदी तोंडावर आपटली, तर सोन्याची विक्रमी घसरण, किंमत तरी काय?
Gold And Silver Price: सुसाट धावणाऱ्या चांदीला एकदाच मोठा ब्रेक लागला आहे. चांदी दणकावून आपटली आहे. तर दुसरीकडे सोन्यातही मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बाजाराकडे ग्राहकांची पावलं वळाली आहे.

किशोर पाटील/प्रतिनिधी/जळगाव: जळगावच्या सराफ बाजारात काल सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर आज सकाळी मार्केट उघडल्यानंतर पुन्हा मोठी घसरण झाली आहे. चांदीत तर विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे. तर दुसरीकडे सोन्याचा तोरा सुद्धा उतरला आहे. त्यामुळे पाठ फिरवलेल्या ग्राहकांची पावलं आपसूकच सराफा बाजाराकडं वळली आहेत. आज दोन्ही मौल्यवान धातुचा(Gold And Silver Price Today) काय आहे भाव, जाणून घ्या.
सोने आणि चांदीत किती घसरण?
काल सोन्याचे दर जीएसटी सह १ लाख ३७ हजार १४५ रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ८५० रुपयांवर पोहोचले होते. आज सकाळी सोन्याच्या दरात 1 हजार 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर जीएसटी सह १ लाख ३५ हजार ४४५ रुपयांवर आले असून चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ९३ हजार रुपयांवर पोहोचले आहे.फेडरल बँकेचे व्याजदर कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडी यामुळे सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचं सराफ व्यवसायिकांनी सांगितले.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव सुट्टीच्या दिवशी अपडेट होत नाही. आज अजून भाव अपडेट करण्यात आलेला नाही. काल 12 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोने 1,30,569 रुपये, 23 कॅरेट 1,30,046, 22 कॅरेट सोने 1,19,601 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 97,927 रुपये, 14 कॅरेट सोने 76,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,92,781 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
यंदा सोन्यात 67 टक्क्यांची वाढ
यंदा घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतीत आतापर्यंत 67 टक्के वाढ दिसून आली आहे. जागतिक परिस्थिती, रुपये आणि डॉलरच्या किंमतीत असाच लपंडाव दिसला. अथवा रुपयात अधिक घसरण झाली तर 2026 मध्ये सोन्याच्या किंमतीत 5 टक्के तर 16 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत यंदा आतापर्यंत 60 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार दिसून येत असल्याची माहिती मनीकंट्रोलने दिली आहे.
