AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या सुपरहिट गाण्यावर गौतमीचा डान्स, ती स्टेप पाहून सर्वच थक्क, Video व्हायरल

गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा धडाकेबाज डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामधील तिच्या हटके स्टेपने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सलमान खानच्या सुपरहिट गाण्यावर गौतमीचा डान्स, ती स्टेप पाहून सर्वच थक्क, Video व्हायरल
| Updated on: Mar 15, 2026 | 1:34 PM
Share

Gautami Patil : गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी पाटीलचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपासून तिने माधुरी दीक्षित सुपरहिट गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा डान्स सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. अशातच आता गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.

गौतमीच्या जबरदस्त डान्स स्टाइल आणि ठसकेबाज अदांनी पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा हटके डान्समुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलच्या या व्हायरल डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा हा डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकांनी पाहिला आहे.

सलमान खानच्या गाण्यावर ठेका

या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील हिने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 1999 मधील ‘हेलो ब्रदर’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘चांदी की डाल पर सोने का मोर’ यावर धमाकेदार डान्स सादर केला आहे. या गाण्यातील तिच्या एनर्जेटिक स्टेप्स आणि एक्सप्रेशन्सने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

दहीहंडीमध्ये कायम वाजणारे गाणे

‘चांदी की डाल पर सोने का मोर’ हे गाणे अनेक वर्षांपासून लोकप्रिय असून विशेषत ते दहीहंडीच्या उत्सवाच्या दिवशी हे गाणे मोठ्या प्रमाणात वाजवले जाते. या गाण्यावर हजारो तरुण-तरुणी ठेका धरताना दिसतात. त्यामुळे या गाण्याला आजही प्रचंड लोकप्रियता आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

अशा लोकप्रिय गाण्यावर गौतमी पाटील हिने केलेला डान्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या डान्समधील ऊर्जा, स्टाइल आणि वेगळ्या स्टेप्समुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले आहे.

आपल्या हटके अंदाज आणि दमदार डान्समुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.