AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : पुढील 48 तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे; अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका, आयएमडीकडून हाय अलर्ट

सध्या राज्यभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, देशातील टॉप टेन अतिउष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली असून, हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Update : पुढील 48 तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे; अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका, आयएमडीकडून हाय अलर्ट
Maharashtra Weather UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 9:03 PM
Share

राज्यात सध्या उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. विदर्भ चांगलाच तापला आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्याचं तापमान हे 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. देशातील टॉप टेन उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश झाला आहे. विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सरासरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर शुक्रवारी देखील विदर्भातील नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासोबतच मराठवाडा देखील चांगलाच तापला आहे.  दरम्यान तापमान वाढल्यामुळे सध्या दुपारच्या वेळेस रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत.

मात्र उष्णतेमुळे हैराण झालेल्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे  पुढील 48 तासांमध्ये तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तरी देखील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.  पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये तापमानात घट होऊन विदर्भासह उर्वरीत राज्यात तापमान हे 40 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान जरी तापमानात घट होणार असली तरी दुसरीकडे पावसाच्या रुपाने महाराष्ट्रावर आणखी एक मोठं संकट आता येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील 24 तास उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर 2 मे पासून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  2 तारखेनंतर विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अर्लट देण्यात आला आहे.  या काळात महाराष्ट्रात  बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील अशी माहिती  हवामान विभागाचे शास्त्राज्ञ एस. डी सानप यांनी दिली आहे. दरम्यान काही लोकांकडून तापामानाबाबत समाज माध्यमांवर चुकीचे संदेश पसरवले जात आहेत, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, हवामान विभागाकडून अधिकृत माहिती दिली जात आहे,  त्यावर विश्वास ठेवा असं आवाहानही यावेळी त्यांनी केलं आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा