Eknath Shinde | बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? एकनाथ शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा…
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशासोबतच बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारीही देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशासोबतच बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारीही देण्यात आली आहे. शिवसेनेकडून यावेळी दोन उमेदवार विधान परिषदेसाठी पाठवले जाणार असून, त्यामध्ये बच्चू कडू यांचा समावेश आहे. विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो, तर शिवसेनेकडे सध्या 57 आमदार असल्यामुळे दोन्ही उमेदवार विजयी होण्याची शक्यता बळावली आहे.
पक्षप्रवेशाच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “सर्वसामान्यांचा नेता” असे संबोधले. “शेतकरी, दिव्यांग, गोरगरीब आणि वंचित घटकांसाठी झटणारा आक्रमक कार्यकर्ता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. अशा नेत्याचा शिवसेनेत प्रवेश हा पक्षासाठी महत्त्वाचा क्षण आहे,” असे शिंदे यांनी म्हटले. तसेच, “बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी गेली 25 वर्षे प्रहार संघटनेच्या माध्यमातून काम केले आणि आता ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. ते केवळ पदासाठी नव्हे, तर विचारांसाठी शिवसेनेत आले आहेत,” असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा उल्लेख करत अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी शिंदे यांनी बच्चू कडू यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन देत, “राजकारणात दिलेला शब्द पाळणे महत्त्वाचे असते. शिवसेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असेही सांगितले.
एकूणच, बच्चू कडू यांच्या या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विशेषतः ग्रामीण आणि विदर्भातील राजकारणावर याचा प्रभाव पडण्याची चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Apr 30, 2026 02:53 PM
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक

