
आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 31 मार्च रोजी 2 सामने पार पडले. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. गुजरातने विजयासाठी मिळालेल्या 163 धावांचं आव्हान हे 5 बॉल राखून पूर्ण केलं. गुजरातसाठी साई सुदर्शन, डेव्हिड मिलर आणि मोहित शर्मा हे तिघे विजयाचे शिल्पकार ठरले. साई आणि मिलरने अनुक्रमे 45 आणि 44 धावा केल्या. तर त्याआधी मोहितने 3 विकेट्स घेतल्या.
तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीने चेन्नईने विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या बॉलपर्यंत झुंज दिली. मात्र चेन्नईचे प्रयत्न 20 धावांनी अपुरे ठरले. चेन्नईने अशाप्रकारे या मोसमातील पहिला सामना गमावला. तर दिल्ली कॅपिट्ल्सने ऋषभ पंतच्या नेतृत्वात विजयाचं खातं उघडलं. या दोन्ही सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टॉप 5 गोलंदाजांमध्ये काय बदल झालाय का? हे जाणून घेऊयात.
चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिजुर रहमान याच्याकडेच पर्पल कॅप कायम आहे. मुस्तफिजुरने दिल्ली विरुद्ध 1 विकेट घेत आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं. गुजरातच्या मोहित शर्माने 3 विकेट्स घेतल्याने त्याने थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.मोहितमुळे दुसऱ्या स्थानी असलेल्या केकेआरच्या हर्षित राणा याची चौथ्या स्थानी घसरण झालीय.
दिल्ली कॅपिट्ल्सच्या खलील अहमद याने चेन्नई विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या. खलील यासह तिसऱ्या क्रमांकावर पोहचला. तर सीएसकेच्या मथीशा पथीराणा याने दिल्ली विरुद्ध 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे मथीशा पर्पल कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.
| गोलंदाज | सामने | इकॉनोमी | विकेट्स |
|---|---|---|---|
| मुस्तफिझुर रहमान | 3 | 8.83 | 7 |
| मयंक यादव | 3 | 5.12 | 6 |
| युजवेंद्र चहल | 3 | 5.50 | 6 |
| मोहित शर्मा | 3 | 7.75 | 6 |
| खलील अहमद | 4 | 8.18 | 6 |
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान