IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपचा किंग कोण? आरसीबी गुजरात टायटन्स सामन्यानंतर काय झालं? वाचा

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल 2024 स्पर्धेच्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरातला पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यानंतर पर्पल कॅपचा मानकरी कोण ठरला? जाणून घ्या

IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपचा किंग कोण? आरसीबी गुजरात टायटन्स सामन्यानंतर काय झालं? वाचा
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 10:55 PM

आयपीएल स्पर्धेतील 52व्या सामन्यात विकेट्सचा पाऊस पडला. या सामन्यात एकूण 16 विकेट्स पडल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स संघ 19.3 षटकं खेळला आणि 10 गडी गमवून 147 धावा करू शकला. तसेच विजयासाठी 148 धावांचं आव्हा दिलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हे आव्हान 13.4 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयामुळे आरसीबीला गुणतालिकेतही फायदा झाला आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सला मात देत सातवं स्थान गाठलं आहे. असं असताना या सामन्यात 16 विकेट्स गेल्याने पर्पल कॅपचा मानकरी कोण? असा प्रश्न पडला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने 2, यश दयालने 2, वियकुमार विशकने 2, कॅमरून ग्रीनने 1 आणि कर्ण शर्माने 1 गडी बाद केला. तर गुजरात टायटन्सकडून जोशुआ लिटलने 4 आणि नूर अहमदने 2 गडी बाद केले. मात्र असं असूनही पर्पल कॅपचा मान जसप्रीत बुमराहकडेच आहे.

जसप्रीत बुमराहने 11 सामन्यात 6.25 च्या इकोनॉमी रेटने 17 गडी बाद केले आहेत. यासह जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी आहे. सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन 8 सामन्यात 15 गडी बाद करत 8.96 च्या इकोनॉमी रेटने दुसऱ्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिझुर रहमान 9 सामन्यात 14 विकेट्स आणि 9.26 च्या इकोनॉमी रेटने तिसऱ्या स्थानी आहे. पंजाब किंग्सचा हर्षल पटेल 10 सामन्यात 14 गडी आणि 10.24 च्या इकोनॉमी रेटने चौथ्या, तर कोलकात्याचा सुनील नरीत 10 सामन्यात 13 गडी बाद करत 6.72 इकोनॉमी रेटने पाचव्या स्थानी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशक.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.