AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i : टीम इंडिया 2 टी 20i सामन्यांसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाहीर

India vs Ireland T20i Series 2026 Schedule : टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i क्रिकेटच्या इतिहासात अजिंक्य आहे. टीम इंडियाने आयर्लंडचा 8 पैकी 8 टी 20i सामन्यांमध्ये पराभव केला आहे.

T20i : टीम इंडिया 2 टी 20i सामन्यांसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाहीर
Paul Sterling and Mohammed Siraj IND vs IREImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 20, 2026 | 9:53 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू आता आयपीएलच्या 19 व्या मोसमात खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार हा 28 मार्च ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. अफगाणिस्तान या भारत दौऱ्यात 6 ते 20 जून दरम्यान 1 कसोटी आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीचं या मालिकेतून अनेक महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक होणार आहे. त्यामुळे या मालिकेची साऱ्यांना प्रतिक्षा असणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

टीम इंडियाचा आयर्लंड दौरा

टीम इंडिया मायदेशातील अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार होती. मात्र त्याआधी टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यजमान या नात्याने आयर्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.

आयर्लंडचा अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंग याने 19 मार्च रोजी टी 20i कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यासोबत टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर येणार असल्याचं क्रिकेट बोर्डाने जाहीर केलं. त्यानंतर गेल्या काही तासांपासून टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात किती सामने खेळणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा लागून होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये, उभयसंघात एकूण 3 टी 20i सामने होणार असल्याची चर्चा होती. मात्र उभयसंघात एकूण किती सामने होणार? याची अधिकृत माहिती समोर आली आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

आयर्लंडचं मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर

1 मालिका आणि 2 सामने

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टी 20i मालिका होणार आहे. उभयसंघात 26 ते 28 दरम्यान एकूण 2 टी 20i सामने होणार आहेत. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा नियमित टी 20i कर्णधार आहे. त्यामुळे सूर्या भारताचं नेतृत्व करेल. मात्र पॉल स्टर्लिंग याच्या राजीनाम्यानंतर आयर्लंडच्या टी 20i संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कुणाला दिली जाते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20i मालिकेचं वेळापत्रक

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 26 जून.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 28 जून.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल