
भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह सध्या आयपीएलच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. श्रीलंके विरुद्धची मालिका संपल्यानंतर बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला व सध्या तो जोरदार तयारी करतोय.

जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये व्यस्त आहे, तर त्याची पत्नी संजना गणेशन न्यूझीलंडमध्ये आहे. तिने तिथून काही फोटो पोस्ट केले आहेत. संजन मौज-मस्तीच्या मूडमध्ये आहे, तिने तिथून वेगवेगळ्या लोकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत.

संजना गणेशन एक टीव्ही प्रेझेंटर असून सध्या ती न्यूझीलंडमध्ये सुरु असलेली महिला वर्ल्ड कप स्पर्धा कव्हर करत आहे. संजना सध्या महिला क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेत आहे.

शेड्यूलड कितीही व्यस्त असलं, तरी संजना गणेशन फिरण्यासाठी त्यातून स्वत:साठी खास वेळ काढत आहे व ते फोटो आपल्या फॉलोअर्स सोबत शेअर करत आहे.

संजनाने फिरण्याचे फोटो शेअर करताना त्याला वेगवेगळे कॅप्शन्स दिले आहेत.

अलीकडेच संजना आणि जसप्रीतने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दोघांनी त्यावेळी परस्परांसाठी सोशल मीडियावर पोस्टही लिहिली होती.

महिला वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर संजना गणेशन मुंबई इंडियन्स संघासोबत दिसू शकतो. मुंबई इंडियन्समधील खेळांडूसोबत त्यांची पत्नी आणि मुलंही आहेत.

क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ती बायो बबलमध्ये जसप्रीत बुमराह सोबत राहू शकते.

जसप्रीत बुमराह आणि संजन गणेशन सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ते चाहत्यांना अपडेट देत असतात.

बुमराह आणि संजना दोघांची ओळख क्रिकेटमुळेच झाली. क्रिकेटच्या पीचवरती सुरु झालेली ही लव्ह स्टोरी एका सुंदर नात्यामध्ये बदलली