AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, 51 वर्षीय गोलंदाजाने मैदान गाजवलं; काय केलं जाणून घ्या

Joanne Hicks Five-Wicket Haul: महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी20 फॉर्मेटमध्ये ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. वयाच्या 51व्या वर्षी गोलंदाजाने एका विक्रम नोंदवला आहे. या विक्रमाची आता क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, 51 वर्षीय गोलंदाजाने मैदान गाजवलं; काय केलं जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, 51 वर्षीय गोलंदाजाने मैदान गाजवलं; काय केलं जाणून घ्याImage Credit source: INSTAGRAM/Isle of Man
| Updated on: Aug 29, 2026 | 4:36 PM
Share

महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आयल ऑफ मॅन आणि ग्रीस हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ग्रीस संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय त्यांच्या अंगाशी आला. ग्रीसने 15 षटकं खेळली आणि सर्व गडी गमवून फक्त 52 धावा केल्या. तसेच आयल ऑफ मॅनसमोर विजयासाठी 53 धावांचं आव्हान ठेवलं. या सामन्यात आयल ऑफ मॅनच्या 51 वर्षीय गोलंदाजाने कमाल केली. 51 वर्षीय फिरकीपटू जोआन हिक्स हीने ग्रीसच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. रोमानियाच्या मोआरा व्लासी क्रिकेट मैदानात खेळलेल्या सामन्यात ग्रीसचा निम्मा संघ एकटीने बाद केला. वय वर्षे 51 आणि 173 दिवस असताना जोआन हिक्सने हा कारनामा केला. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 149 वर्षांच्या इतिहासात 50 वर्षानंतर पाच विकेट घेणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

क्रिकेट इतिहासात जोआन हिक्सने या कामगिरीसह 96 वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू बर्ट आयर्नमोंगर यांच्या नावावर होता. आयर्नमोंगर यांनी 1932 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वय वर्षे 49 आणि 314 दिवस असताना पाच विकेट घेण्याचा विक्रम केला होता. आता जोआनने 51व्या वर्षी ही कामगिरी करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे जोआनने वयाच्या 47 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदापर्ण केल्यानंतर अवघ्या 4 वर्षात तिने हा कारनामा केला. जोआन हिक्सने 4 षटकात फक्त 10 धावा दिल्या आणि 5 विकेट काढल्या. तिच्या या कामगिरीच्या जोरावार आयल ऑफ मॅन संघाने विजय मिळवला. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरीसाठी जोआन हिक्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

जोआन हिक्सने घेतलेल्या पाच पैकी चार विकेट या त्रिफळाचीत आणि पायचीत होत्या. लिडिया कटसिमारीला बोल्ड, सोफिया-नेफेली जॉर्जोटा एलबीडब्ल्यू, अँजेलिकी-आयोआना अर्गीरोपोलो बोल्ड, थिओडोरा पॅरिसी-मेसिमेरी एलबीडब्ल्यू आणि अलेक्सांद्रा कुरकुलू झेल बाद केलं. जोआनने आतापर्यंतच्या क्रिकेट कारकि‍र्दीत तिसऱ्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. हा तिचा 29वा टी20 सामना होता. आतापर्यंत तिने 36 विकेट आपल्या नावावर केले आहेत.

Follow Us
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप