Mumbai Indians: अंबानींच्या मुंबई फ्रेंचायजीने राशिद खान, कायरन पोलार्डला बनवलं कॅप्टन

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

Mumbai Indians: अंबानींच्या मुंबई फ्रेंचायजीने राशिद खान, कायरन पोलार्डला बनवलं कॅप्टन
kieron pollard and rashid khan
Image Credit source: ACB
| Updated on: Dec 02, 2022 | 5:06 PM

मुंबई: IPL 2023 सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा सदस्य कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. पण पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या कोचिंग टीममध्ये असणार आहे. मुंबई फ्रेंचायजीने पोलार्डला आपल्या एका टीमच कॅप्टन बनवलय. इतकच नव्हे, तर मुंबई फ्रेंचायजीने अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खानलाही मोठी जबाबदारी सोपवलीय.

पोलार्ड, राशिद खान मुंबई फ्रेंचायजीचा हिस्सा

मुंबई फ्रेंचायजीने यूएई टी 20 लीग आणि दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगमध्ये टीम विकत घेतल्या आहेत. पोलार्ड आणि राशिद खान या लीगमध्ये मुंबई फ्रेंचायजीचा भाग असतील.

पोलार्डला बनवलं कॅप्टन

पोलार्डला यूएई टी 20 लीगमध्ये एमआय अमीरातचा कॅप्टन बनवण्यात आलं आहे. पोलार्ड 2010 पासून मुंबई फ्रेंचायजीचा भाग आहे. तेव्हापासून तो आयपीएलमध्ये खेळतोय. आता तो आयपीएल बाहेर फ्रेंचायजीच्या एका टीमच नेतृत्व करणार आहे.

राशिद खानलाही बनवलं कॅप्टन

राशिद खान आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळतो. याआधी तो सनरायजर्स हैदराबादसाठी खेळायचा. दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगसाठी मुंबई फ्रेंचायजीने राशिद खानला ड्राफ्टमध्ये विकत घेतलं होतं. आता तो मुंबईच्या केपटाऊन टीमच नेतृत्व करणार आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएलमधला एक यशस्वी संघ आहे. दक्षिण आफ्रिका आणि यूएईमध्ये लीगमध्ये तशीच कमाल करण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल.