KKR vs PBKS Toss : केकेआरला पंजाब विरूद्धच्या सामन्यात मोठा झटका, 2 मॅचविनर फिरकीपटू आऊट, कुणाला संधी?
Kolkata Knight Riders vs Punjab Kings Toss and Playing 11 : केकेआरने आधीच सलग 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे केकेआरसमोर पंजाब विरुद्ध विजय मिळवण्याचं आव्हान आहे. मात्र केकेआरच्या 2 खेळाडूंना पंजाब विरूद्धच्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. केकेआर आणि पंजाब दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. केकेआरने पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. तर पंजाबने दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या कामगिरीत आतापर्यंत फार तफावत असल्याचं स्पष्ट आहे. या सामन्याला कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. केकेआरच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
केकेआरच्या गोटात स्वत: अजिंक्य, फिन एलन, रिंकु सिंह, कॅमरुन ग्रीन यासारखे विस्फोटक आणि एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेले फलंदाज आहेत. मात्र अपवाद वगळता या फलंदाजांना 19 व्या मोसमातील आपल्या पहिल्या 2 सामन्यांत छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे केकेआरच्या फलंदाजांसमोर घरच्या मैदानात पंजाब विरुद्ध लौकीकाला साजेशी कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे.
पंजाब प्लेइंग ईलेव्हन अनचेंज, केकेआरकडून 2 बदल
पंजाबने विजयी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला केकेआरने सलग 2 पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. मात्र केकेआरला नाईलाजाने हे दोन्ही बदल करावे लागले आहेत.
केकेआरचे 2 मॅचविनर फिरकीपटू आऊट
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागलं आहे. वरुण चक्रवर्ती याला गेल्या सामन्यात कॅच घेताना दुखापत झाली होती. त्यामुळे वरुणला या सामन्याला मुकावं लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला सुनील नारायण आजारी असल्याने त्याला या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे रोव्हमॅन पॉवेल आणि नवदीप सैनी या दोघांना संधी देण्यात आली आहे. नवदीप सैनी याचं यासह केकेआरकडून पदार्पण झालं आहे.
नवदीप सैनीचं केकेआरसाठी पदार्पण
Navdeep & Rovman come 𝐈𝐍 as we bat first 🏏 pic.twitter.com/Yuu2RbQIfY
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2026
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कोनोली, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, झेव्हीयर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : फिन ऍलन, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), कॅमेरुन ग्रीन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), रोव्हमॅन पॉवेल रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, नवदीप सैनी, वैभव अरोरा आणि कार्तिक त्यागी.