LSG vs DC Toss : दिल्लीची लखनौ विरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग 11 मध्ये अर्जून-पृथ्वीचा शॉचा समावेश?
Lucknow Super Giants vs Delhi Capitals Toss : लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सलग 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे लखनौसमोर दिल्ली विरुद्ध पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान असणार आहे.

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या पर्वातील (IPL 2026) पाचव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा त्यांच्या मोहिमेतील पहिला सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे लखनौतील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार अक्षर पटेन याने फिल्डिंगचा निर्णय घेत लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
लखनौ-दिल्ली दोन्ही संघ तुल्यबळ
लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील एका सामन्याचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांत एकूण 7 सामने झाले आहेत. दिल्लीने या 7 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर लखनौने 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 4 सामन्यांमध्ये दिल्ली लखनौवर वरचढ राहिली आहे. दिल्लीने लखनौ विरुद्ध गेल्या सलग 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे लखनौ दिल्ली पराभूत करुन विजयी पंच लगावण्यापासून रोखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अर्जून आणि पृथ्वीला संधी नाही
जिवलग मित्र आणि क्रिकेटपटू असलेले पृथ्वी शॉ आणि अर्जून तेंडूलकर या दोघांचे संघ आमनेसामने आहेत. पृथ्वी दिल्लीचं तर अर्जून लखनौचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळेल का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र यो दोघांना संधी मिळाली नाही.
लाईव्ह स्कोअरकार्ड
मोहम्मद शमीच्या कामगिरीकडे लक्ष
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. शमीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करुनही बीसीसीआय निवड समितीकडून भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शमी या 19 व्या मोसमात बॉलिंगने कशी सुरुवात करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शमी लखनौचं प्रतिनिधित्व करत आहे.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहसीन खान, मोहम्मद शमी, एनरिक नॉर्खिया, प्रिन्स यादव
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एन्गिडी, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुकेश कुमार.