AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs DC IPL 2026 : दिल्ली कॅपिट्ल्स सलामीच्या सामन्यासाठी सज्ज, लखनौ पलटवार करणार?

Lucknow Super Giants vs Delhi Capitals IPL 2026 : दिल्ली कॅपिट्ल्सने 18 व्या मोसमात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आपला दबदबा कायम राखत दोन्ही सामने जिंकले. त्यामुळे यंदा लखनौचा दिल्ली विरुद्ध गेल्या पराभवाचा हिशोब करण्याचा प्रयत्न असणार आहे.

LSG vs DC IPL 2026 : दिल्ली कॅपिट्ल्स सलामीच्या सामन्यासाठी सज्ज, लखनौ पलटवार करणार?
LSG vs DC IPL 2026 Match PreviewImage Credit source: @LucknowIPL and @DelhiCapitals X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 01, 2026 | 8:02 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात 31 मार्चपर्यंत यशस्वीरित्या एकूण 4 सामने खेळवण्यात आले. आता पहिल्या टप्प्यातील पाचवा आणि शेवटचा सामना हा आज बुधवारी 1 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या मोसमातील पाचव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा सामना जिंकून मोसमात विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे.अशात कोणता संघ यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लखनौ-दिल्लीची धुरा कुणाकडे?

ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्ली कॅपिट्ल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही ऑलराउंडर अक्षर पटेल याच्याकडे आहे. लखनौने पंतसाठी थोडेथोडेके नव्हे तर तब्बल 27 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे पंतसमोर स्वत: फलंदाज आणि कर्णधार म्हणून सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे.

लखनौ पलटवार करत विजयी सुरुवात करणार?

प्रत्येक संघ मैदानात विजयासाठीच उतरत असतो. मात्र लखनौ आयपीएलच्या 18 व्या मोसमात दिल्लीसमोर फ्लॉप ठरली. लखनौला गेल्या हंगामातील दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीकडून पराभूत व्हावं लागलं. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी गेल्या मोसमातील आपला पहिला सामना हा एकमेकांविरुद्धच खेळला होता. त्यामुळे यंदा लखनौचा यंदा दिल्ली विरुद्ध पलटवार करुन विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे.

सामना कुठे?

लखनौ विरुद्ध दिल्ली हा सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. लखनौचा हा होम ग्राउंड आहे. त्यामुळे लखनौ घरच्या मैदानात दिल्लीला पराभूत करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर?

लखनौमधील ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे लखनौचा दिग्विजय सिंह राठी आणि दिल्ली कॅपिटल्सच्या कुलदीप यादव-कॅप्टन अक्षर पटेल या तिघांपैकी या खेळपट्टीवर कुणाची चलती पाहायला मिळणार? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.

पृथ्वी शॉ याला संधी मिळणार?

दिल्ली कॅपिट्ल्स पृथ्वी शॉ याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. पृथ्वीला निराशाजनक कामगिरीमुळे गेल्या मोसमात कुणीच घेतलं नव्हतं. मात्र यंदा दिल्लीने पुन्हा एकदा पृथ्वीला संधी दिली आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट हाच विश्वास कायम ठेवत पृथ्वीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा