.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : 3 संघांची 18 वर्षांपासून चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा कायम, आरसीबीनंतर कोण उंचावणार ट्रॉफी?

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेतील सुरुवातीच्या काही हंगामात 8 संघ सहभागी झाले होते. त्यानंतर आता गेल्या काही मोसमांपासून सातत्याने 10 संघ सहभागी होत आहेत. या 10 पैकी 3 संघांना अजूनही एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

IPL 2026 : 3 संघांची 18 वर्षांपासून चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा कायम, आरसीबीनंतर कोण उंचावणार ट्रॉफी?
Tata IPL TrophyImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 26, 2026 | 6:31 AM
Share

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे या स्पर्धेच्या मोसमातील 2 यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. एका बाजूला या 2 संघांनी 5-5 वेळा ट्रॉफी उंचावली आहे. तर दुसऱ्या बाजूला असे काही संघ आहेत ज्यांची गेल्या 18 वर्षांपासून आयपीएल चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे यंदा या तिघांपैकी कोणता संघ आपली प्रतिक्षा संपवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

3 संघांची आयपीएल ट्रॉफीची प्रतिक्षा कायम

लखनौ सुपर जांयट्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या 3 संघांना आतापर्यंत एकदाही आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवता आलेला नाही. या 3 संघांप्रमाणे आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचंही गेल्या 17 मोसमापासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न होतं. आरसीबीचं हे स्वप्न 18 व्या मोसमात पूर्ण झालं. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली. त्यामुळे यंदा या तिघांपैकी कोणता संघ आरसीबीप्रमाणे आयपीएल ट्रॉफीची प्रतिक्षा संपवण्यात यशस्वी ठरतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पंजाब आणि दिल्ली दोन्ही संघ आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून खेळत आहेत. तर लखनौचं 2022 साली या स्पर्धेत पदार्पण झालं. लखनौचं यंदाचं पाचवं वर्ष आहे. लखनौप्रमाणे गुजरातनेही 2022 साली आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. मात्र गुजरातने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात पहिल्याच मोसमात आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता. तर लखनौ, पंजाब आणि दिल्ली यांची पहिल्या मोसमापासून ट्रॉफीची प्रतिक्षा कायम आहे.

टीमचं नाव बदललं, मात्र नशिब बदलेना

दिल्ली आणि पंजाब या संघांचं नाव बदललंय. नाव बदलून काही चमत्कार होतो का? हा प्रयोगही दिल्ली आणि पंजाबकडून करण्यात आला. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. दिल्ली कॅपिट्ल्सचं आधीचं नाव हे दिल्ली कॅपिट्ल्स असं होतं. तर पंजाब किंग्स आधी किंग्स इलेव्हन पंजाब होती.

पंजाब 2 तर दिल्ली 1 वेळ उपविजेता

दरम्यान आतापर्यंत पंजाबचं 2 वेळा तर दिल्लीचं एकदा आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलंय. किंग्स इलेव्हन पंजाब 2014 तर पंजाब किंग्स 2025 साली उपविजेता राहिली. तर दिल्ली कॅपिट्ल्स 2020 साली आयपीएल ट्रॉफीपासून 1 पाऊल दूर राहिली होती.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर