Mumbai Indian Head Coach : मुंबई इंडियन्सला जबर धक्का! हेड कोचचा तडकाफडकी राजीनामा; IPL 2027 च्या आधीच नवी अडचण समोर
मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धन यांनी आपलं पद सोडलं आहे. महिला जयवर्धने यांचा हा दुसरा कार्यकाळ होता. याआधी त्यांनी 2017 ते 2022 पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते.

Mumbai Indians Head Coach : आयपीएलच्या आगामी हंगामाची सर्वांनाच प्रतीक्षा लागलीय. वेगवेगळ्या संघांनी या हंगामासाठी तयारीदेखील सुरू केलीय. मुंबई इंडियन्स या संघानेदेखील आतापासूनच कंबर कसलीय. एकीकडे आयपीएल 2027 हंगामाची तयारी सुरू झालेली असताना दुसरीकडे याच संघाला जबर धक्का बसलाय. या संघाच्या प्रमुख प्रशीक्षकाने म्हणजेच हेड कोचने पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएल 2027 सुरु व्हायच्या अगोदरच ही माहिती समोर आलीय. आता मुंबई इंडियन्स संघाला नवा हेड कोच शोधावा लागणार आहे.
संघात नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धन यांनी आपलं पद सोडलं आहे. महिला जयवर्धने यांचा हा दुसरा कार्यकाळ होता. याआधी त्यांनी 2017 ते 2022 पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. मुंबई इंडियन्स संघाने निवेदन प्रसिद्ध करत हा निर्णय कळवला आहे. जयवर्धने यांच्या एकूण कार्यकाळात मुंबई इंडियन्सने तीन वेळा जेतेपद पटकावले. जयवर्धने यांच्या दोन्ही कार्यकाळात शिस्त, सहकार्य आणि टीम-फर्स्ट ही भावना कायम शीर्षस्थानी होती, असे मुंबई इंडियन्स फ्रेन्चॅयझीने सांगितले आहे.
मुंंबई इंडियन्सने नेमकं काय सांगितलं?
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या निवेदनात जयवर्धने यांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत. “2017 ते 2022 आणि पुन्हा 2024 ते 2026 या दोन्ही कार्यकाळात जयवर्धने यांनी संघात एक चांगले वातावरण तयार केले. त्यांच्या कार्यकाळात संघात एक शिस्त कायम राहिली,” असं मुंबई इंडियन्स संघाने सांगितलं.
तर मुख्य प्रशिक्षकपदापासून दूर झाल्यनंतर जयवर्धने यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुंबई इंडियन्स संघासोबतचा प्रवास खूप विशेष होता, अशा भावना व्यक्त केल्या. तसेच खेळाडू, कोचिंग स्टाफ, फॅन्स, संघाचे मालक नीता आणि आकाश अंबानी यांचेही आभार मानले आहेत. आगामी काळात मुंबई इंडियन्स संघ अशीच प्रगती करत राहो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
