Video | 2019 वर्ल्ड कपबाबत महेंद्र सिंह धोनी भरभरून बोलला, मला माहित होतं की…

वर्ल्ड कप 2019 ची सेमी फायनल कोणीही विसरू शकत नाही. महेंद्र सिंह धोनीचा रन आऊट प्रत्येकाच्या लक्षात राहिला असेल. त्यावेळी धोनीच्या मनात काय सुरू होतं? याबाबत धोनीने भाष्य केलं आहे.

Video | 2019 वर्ल्ड कपबाबत महेंद्र सिंह धोनी भरभरून बोलला, मला माहित होतं की...
| Updated on: Aug 01, 2024 | 4:10 PM

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला असून 13 वर्षांचा दुष्काळ संपवलाय. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. टीम इंडिया आणि चाहत्यांच्या मनात वन डे वर्ल्ड कपची सल कायम राहणार आहे. 2019 मध्ये सेमी फानयल आणि 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. करोडो भारतीयांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. मात्र अशातच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र सिंह धोनीने 2019 च्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवावर भाष्य केलं आहे.

10 जुलैला मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाला 240 धावांचं आव्हान मिळालं होतं. या धावांचा पाठलाग करतान टीम इंडियाच्या सुरूवातीच्या झटपट विकेट पडल्या होत्या. त्यावेळी महेंद्र सिंह धोनी मैदानात तग धरून बसला होता. सर्व देशवासियांना  फक्त धोनीकडूनच अपेक्षा होत्या. सुरूवातीचे फलंदाज आऊट झाल्यावर टीम इंडियाकडून धोनी आणि जडेजा यांनी 59 चेंडूत 77 धावांची भागीदारी केल होती. जडेजा आऊट झाला आणि मैदानात धोनी एकटाच मुख्य फलंदाज राहिला होता.

टीम इंडियाला 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता होती. धोनीने पहिल्या बॉलवर सिक्सर मारला होता. त्यामुळे धोनी फिनिश करणार असं सर्वांना वाटू लागलं पण दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात तो रनआऊट झाला. न्यूझीलंड संघाच्या मार्टिन गप्टिलचा थ्रो डायरेक्ट विकेटवर बसला. धोनीची बॅट क्रीझपर्यंत पोहोहता पोहोचता राहिली. त्यावेळी धोनीसह सर्व देशवासियांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यानंतर धोनीने स्वत:ला कसं सावरलं याबाबत  एका कार्यक्रमात धोनीने भाष्य केलं आहे.

माझ्यासाठी खूप अवघड होतं कारण माझा तो शेवटचा वर्ल्ड कप होता. मी माझे शंभर टक्के प्रयत्न केले होते पण विजय मिळवता आला नाही. हर्ट ब्रेक झाल्यासारखं झालं होतं पण मी निकाल स्वीकारत त्यामधून सावरणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर मी आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यामुळे मला खूप वेळ मिळाल्याचं एम. एस.धोनी म्हणाला.

 

दरम्यान, 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा 18 धावांनी पराभव झाला होता. महेंद्र सिंह धोनीने 72 बॉलमध्ये 50 धावा केल्या होत्या. धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो शेवटचा सामना होता. धोनीने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता त्यानंतर भारताला 2019 आणि 2023 मध्ये परत एकदा तशी कामगिरी करण्याची संधी होती पण तसे काही झाले नाही.