
एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये सामना होणार आहे. एडिलेडमध्ये होणाऱ्या या मॅचआधी इंग्लंडच्या टीमला मोठा झटका बसला आहे. सेमीफायनलआधी इंग्लंडचा आणखी एक खेळाडू अनफिट ठरलाय असं दिसतय. मीडिया रिपोर्ट्सनुसार इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड इंग्लंडच प्रॅक्टिस सेशन सोडून निघून गेला. त्रास होत असल्यामुळे तो प्रॅक्टिस सेशनमधून बाहेर पडला. मार्क वुड इंग्लंडच्या मोठ्या मॅचविनर पैकी एक आहे.
मार्क वुडचा घातक स्पेल
मार्क वुडने चालू टी 20 वर्ल्ड कपमध्ये 4 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्यात. तो या टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वाधिक वेगाने बॉलिंग करणारा गोलंदाज आहे. त्याने 154.74 प्रतितास वेगाने चेंडू टाकलाय. त्याशिवाय मार्क वुडने अफगाणिस्तान विरुद्ध सुपर 12 राऊंडमध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाजीचा स्पेल टाकला होता. त्याच्या गोलंदाजीचा वेग 149.02 किमी प्रतितास होता.
तो एक झटका असेल
मार्क वुड भारताविरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये खेळला नाही, तर इंग्लिश टीमसाठी तो एक झटका असेल. डेविड मलान सुद्धा दुखापतग्रस्त आहे. त्याचं सेमीफायनलमध्ये खेळणं निश्चित नाहीय. त्याच्याजागी फिल सॉल्ट सेमीफायनलमध्ये खेळू शकतो.
भारत आणि इंग्लंडची टीम एडिलेडमध्ये होणाऱ्या सेमीफायनल मॅचसाठी कसून सराव करतेय. मंगळवारी विराट कोहली, कॅप्टन रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकने जोरदार सराव केला.